नरभक्षक बिबट्याला ठार करा अन्यथा तीव्र आंदोलन,
विजय खरवडे भारतीय जनसंसद यांचे वनसंरक्षक यांना निवेदन,
गडचिरोली प्रतिनिधी
संदीप कांबळे
9421318021
गडचिरोली जिल्ह्यातील वनविभाग आलापल्ली व चपराळा अभयारण्यात मागील काही महीन्या पासुन नरभक्षक बिबट्याचा वावर असुन सदर बिबट्याने आतापर्यंत तीन माणसाला जिवंत मारले व तिन माणसाना गंभीर जखमी केले तसेच आता पर्यंत गाई,म्हशी ,बकरे या सह अनेक कोंबड्या फस्त केल्या.या कडे वनविभागाचे पुर्णत: दुर्लक्ष झाले असुन सदर नरभक्षक बिबट्याला तातडीने जेरबंद करावे या करीता भारतीय जनसंसदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यानी प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख व वन्यजीव तसेच आलापल्ली वनविभागाचे उपवन संरक्षक यांना लेखी निवेदन दिले,
व बिबट्याचा बंदोस्त करावा अशी मागणी केली,अन्यथा तीव्र आंदोलन करणार असे संकेत निवेदनाद्वारे करण्यात आले,