विहिरगाव (पोर्ला)च्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात बैल जखमी,
संदीप कांबळे
गडचिरोली प्रतिनिधी
9421318021
गडचिरोली पासून अवघ्या 12 किलोमीटरवर असलेल्या पोर्ला विहिरगाव च्या जंगलात आज चराई साठी गेलेल्या बैलावर वाघाने हल्ला केला,संबंधित जखमी झालेल्या बैलाचा पंचनामा करून वनविभाग कार्यालयातून जखमी झालेल्या बैलाच्या मालकाला मदत मिळावी अशी आशा गावकऱ्यांनी केली आहे, तसेच नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात आजपर्यंत 15 लोकांचा बळी पण गेलेला आहे,
सद्या गडचिरोली तालुक्यात अंदाजे 32 वाघ असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे, ताडोबा सारखा गडचिरोली व्याग्र झोन म्हणून घोषित करावा व तालुक्यातील गावे इतरत्र स्थलांतरित करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे,