नवोदय परीक्षेत खुटाळा शाळेतील मिनल गायकवाड चे सुयश
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे
सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या नवोदय परीक्षेत जि. प. उच्च. प्रा. शाळा खुटाळा येथील मिनल गुणवंत गायकवाड या विद्यार्थिनी ने उत्तम गुण मिळवून ओपन संवर्गातून नवोदय विद्यालय करीता पात्र ठरली आहे.
मीनल ही ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थीनी असून अभ्यास करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना तिने केला तसेच कोरोनाच्या काळात तिने उजववल यश प्राप्त केले ही या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शिकण्याची बाब आहे या विद्यार्थीनी नवोदय परीक्षेसाठी स्पेशल क्लास द्वारे शाळेत तयारी केली. आपल्या अभ्यासातील सातत्य व जिद्दीने त्यांनी हे यश संपादन केले आहे.
यशस्वी झालेल्या मिनल गुणवंत गायकवाड या विद्यार्थिनीचे खुटाळा गावात , परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
मिनल ने आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक मा. कहूरके सर, मार्गदर्शक कामडी सर, सर्व शिक्षकवृंद तसेच आई, वडील व शाळा व्यवस्थापन समिती खुटाळा यांना दिले आहे.
