काजळसर येथे समृद्धी गांव विकासबजेट साठी शिवार फेरीचे आयोजन
चिमुर तालुका ग्रामिन प्रतिनिधी
सचिन वाघे मो.9673757006
चिमूर तालुक्यातील नेरी वरुन जवळ असलेल्या काजळसर येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सन 2022 -2023 या वर्षाकरिता समृद्धी आराखडा तयार करण्याकरीता गाव शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. शिवार फेरीमध्ये मुख्य पाणलोट क्षेत्राचे नियोजन करणे नदी तलाव धरण पाजर तलाव बोडी व विहीर पुनर्भरण फळबाग लागवड वृक्ष लागवड ,कृषी विषयक योजना व माहिती मार्गदर्शन कृषी सहायक रणदिवे यांनी केले. या अनुषंगाने शिवार फेरीचे निरीक्षण करण्यात आले त्या त्यानंतर रोजगार सेवक गिरीधर कातलाम येथील ग्रामपंचायत चे सचिव सरपंच उपसरपंच यांनी ग्रामस्थांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजने बाबत अनेक ग्रामस्थांना महत्त्व सांगून त्याबद्दलन मार्गदर्शन केले तसेच या योजनेचे फायदे काय याबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच या कामावर कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना आणि मजुरांना कश्या पद्धतीने फायदा होईल आणि योजनेचा फायदा करून घेता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले तसेच शेतकऱ्यांना पीक पाणी सिंचन आणि प्रकल्प पद्धतीने शेती कशी करायची याची माहिती व शेतातील पिकांचे रक्षण कसे कराल याबद्दल माहिती यावेळी कृषी सहाययक रणदिवे यांनी सांगितले
यावेळी या शिवार फेरीला कृषी सहाययक रणदिवे आहेब सचिव आर आर चहांदे सरपंच आशीष ननावरे उपसरपंच अशोक खोब्रागडे ग्रा प सदस्य गण श्रीकृष्ण सामुसाकडे अर्चना गरमडे रोजगार सेवक गिरीधर कातलाम लालाजी मेश्राम बेबी बोरकर विनोद हटवादे हरिदास मडावी सुधाकर कातलाम निकेश रामटेके पो पाटील अनिल चौधरी ग्रा प शिपाई आणि गावकरी उपस्थित होते
