आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या उपस्थितीत चिमूर मीडिया फाउंडेशन चे अध्यक्ष विनोद शर्मा यांचा वाढदिवस साजरा
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी:-प्रवीण वाघे,
आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या निवासस्थानी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार प्रतिनिधीयांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा
पत्रकार भवन साठी निधी उपलब्ध करून देणार
चिमूर मीडिया फाऊंडेशन चे अध्यक्ष विनोदजी शर्मा यांचा आज 1ऑक्टोबर ला वाढदिवस होता चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार यांच्या उपस्थितीत मोट्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला
चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडीया हे सामाजिक उपक्रम राबवून आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे वाढदिवस स्वतःच्या निवासस्थानी केक कापूस साजरा करतात आणि शुभेच्छा देऊन अभिनंदन करतात तसेच आज चिमूर मीडिया फाऊंडेशन चे अध्यक्ष विनोद शर्मा यांचे वाढदिवस असल्याचे कळताच त्यांनी शर्माजी याना आपल्या निवासस्थानी बोलावून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि पत्रकार यांच्या उपस्थितीत केक कापून मोठया उत्साहात साजरा केला गेला तसेच या वाढदिवसाच्या निमित्य चिमूर मीडिया फाऊंडेशन च्या अध्यक्ष याच्या वाढदिवसाच्या दिनी येणाऱ्या काळात पत्रकार भवन निर्मिती साठी निधी उपलब्ध करून देण्याचे शब्द दिले पत्रकाराना.