ब्रेकिंग न्यूज़
विज पडून सहा लोक गंभीर जखमी
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधि
मनोज अगळे
9765874115
ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा बोद्रा येथिल विज पडून सहा लोक गंभीर जखमी
सविस्तर असे कि मौजा बोद्रा (ऐकारा) येथिल शेतकरी नेहमि प्रमाने आपल्या शेतावर गेले असता. आज दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाट सह पावसाने सुरवात केली असता आजुबाजूला आप आपल्या शेतावर असलेले 1).श्रि मनोज अशोक बोरकर वय 32 वर्ष 2) पाडूरंग सोमा बोरकर वय 47 वर्ष 3) वंदना पाडूरंग बोरकर वय 45 वर्ष 4) मारोती सोमा बोरकर वय 45 वर्ष व गोला भुज (राजोली ) मारोती बोरकर यांचे कडे आलेले पाहूने असे सर्व मिळून मनोज बोरकर यांचे शेतावर असलेल्या माऱ्याखाली एकत्रित बसलेले होते. अशातस अचानक माऱ्याजवळ विज कोसळल्याने सहा ही लोक गंभिररीत्या जखमी झाले. त्यात मनोज अशोक बोरकर हा गंभीररित्या जखमी झाल्याने त्याची प्रक्रुती चितांजनक आहे.त्याला ख्रिस्तानंद रूग्नालय ब्रम्हपुरी येथे हलविन्यात आले आहे. बाकी पाच जखमीना ग्रामीण रूग्नालय सिंदेवाही येथे हलविन्यात आले आहे.