नेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाजले तीन तेरा नव बारा पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट
तेथील कर्मचार्यांची उद्धट पध्दतीची भाषा.यांच्या पाठीमागे नेमका कुनाचा आशीर्वाद.
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे मो, 7038115037
चिमूर:- प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी अनेक दिवसांपासून विविध समस्यांच्या विळख्यात आहे. येथे आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा नव बारा वाजले आहे. प्रा.स्वा.केंद्र नेरी अंतर्गत अनेक गावे हे समाविष्ट आहेत,मोठ्या प्रमाणात नागरिक उपचारासाठी तसेच सध्या कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्रा.स्वा.केंद्रात येत असतात मात्र येथे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही पिण्याच्या पाण्याची साधी कॅन ठेवली आहे मात्र पाणी प्यायला ग्लास नाही. त्यामुळे नाईलाजास्तव रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना हाताच्या ओंजळीने पाणी प्यावे लागतो या संबंधित उपस्थित काही गावकर्यांनी विचारपुस केली असता तेथील एका स्त्री,कर्मचारी यांनी याला धंदेच नाही अश्या ऊद्धट पद्धतीने ऊत्तर दिल.या कर्मचार्यांच्या पाठीमागे कुनाचा आशीर्वाद आहे का असा दबक्या आवाजात नेरी वासीय नागरीकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे संबंधित रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष्यांचे की आरोग्य विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष म्हनाव कि, नेरी परीसरातील जनतेची सहन करण्याची सहनशक्ती म्हनाव हेच कळायला मार्ग नसुन,याबाबात तात्काळ पिण्याच्या पाण्याची फिल्टर टाकी,येत्या आठ दिवसाच्या आत ऊपलब्ध करा. व ऊध्दट पद्धतीने ऊत्तरे देणार्या कर्मचार्यांना सर्व येणाऱ्या नागरीकांशी सौजन्याने वागावे व अशी तंबी द्यावी. यानंतर अशे कुठलेही गैरवर्तन होता कामा नये अशी कडक शब्दात सुचना करन्यासाठी अश्या विविध मागण्या घेऊन वंचित बहुजन आघाडी & प्रहार संघटनेच्या माध्यमातून मनोज मामीडवार रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले. येत्या आठ दिवसात कर्मचार्यांची ऊध्दटपने बोलण्याची वागणूक व, पीण्याच्या पाण्याची टाकी या मागण्या आठ दिवसात पूर्ण न झाल्यास नेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पुढे डरकाळी आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
