ज्योतिराव फुले समाजकार्य महाविद्यालय उमरेड (राष्ट्रीय सेवा योजना) तसेच नगर परिषद उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने पथनाट्याद्वारे जनजागृती
उमरेड तालुका प्रतिनिधी
मनोज चाचरकर 9970643453
ज्योतिराव फुले समाजकार्य महाविद्यालय उमरेड (राष्ट्रीय सेवा योजना) तसेच नगर परिषद उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 1 ऑक्टोबर 2021 रोजी शुक्रवार ला उमरेड येथील जुना बस स्टँड तसेच भिसी नाका चौक येथे पथनाट्याद्वारे ओला कचरा सुखा कचरा व्यवस्थापन या विषयावर जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख श्री प्रा. सिद्धार्थ टेंभुर्णे सर, परिषद उमरेड येथील स्वच्छता विभाग प्रमुख चव्हाण सर, तसेच नगर परिषदेतील कर्मचारी आणि ज्योतिराव फुले समाजकार्य महाविद्यालयातील राकेश कारमोरे, हितेश गडबोरिकर, शुभम मेश्राम, पवन उताने, लक्ष्मण मोरे, सत्यपाल चव्हाण, माधुरी हांडे, स्वीटी धोपटे, भारती हांडे, वैष्णवी बाटाले, इंदिरा जाधव आदी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
