तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान स्व.लालबहाद्दुर शास्त्री यांची जयंती संपन्न
नागभीड तालुका प्रतिनिधी
महेश आलबनकर मो 8788794129
तालुका काँग्रेस कमिटी नागभीडच्या वतीने आज दि.2 ऑक्टोबर 2021 राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांची जयंती तालुका काँग्रेस कार्यालय (राजाराम पाटील वारजुकर भवन) नागभीड येथे साजरी करण्यात आली.
यावेळी नागभीड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी, काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रा.मोहनजी जगनाडे सर,काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेशभाऊ ठाकरे,किशोरजी समर्थ, नगर परिषद गटनेते संजयभाऊ अमृतकर,नगरसेवक प्रतिकभाऊ भसिन, युवानेते अमोलभाऊ वानखेडे, युवक काँग्रेस कमिटीचे शहरअध्यक्ष अमितभाऊ संदोकर, कानपा-मौशी जि.प. समन्वयक संजयभाऊ माकोडे, नागभीड नगर परीषद समन्वयक हरिषभाऊ मुळे,जेष्ठ कार्यकर्ते मधुभाऊ बावणकर,महेश आलबनकर, घनश्यामभाऊ नवघडे, युवा कार्यकर्ते महेशभाऊ कुर्झेकर,राकेशभाऊ मेश्राम,शाकीर शेख तसेच काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
