बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या- संतोष खंदारे ऋषी आहेरकर

 बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या- संतोष खंदारे ऋषी आहेरकर


(महाराष्ट्र न्यूज)

प्रतिनिधी

७७८९०७१८७६


मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील सर्वत्र मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकर्यांकचे अतोनात नुकसान झाले असुन प्रशासनाने जाचक अटी न लावता सर्व अतिवृष्टीच्या अहवालानुसार सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी संघर्ष सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष श्री.संतोष भैय्या खंदारे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातुन मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांच्याकडे केली आहे. 

   मागील १५ दिवसांपासुन मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या  सोयाबीन,ज्वारी,कापूस,उडीद,मूग,बाजरी,ज्वारी,सूर्यफूल सह अनेक पिकांचे व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व शेती देखील वाहुन गेली असुन अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी,व्याजाने पैसे घेऊन पिकाची जोपासना केली होती,परंतु ऐन पीक काढणीच्या वेळीच अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांनी केलेली मेहनत वाया गेली आहे हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने पळवला आहे यामुळे शेतकरी बांधवांना ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट हेक्टरी ५०,००० रु येवढी मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी अन्यथा स्वाभिमानी संघर्ष सेना शेतकरी बांधवांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा स्वाभिमानी संघर्ष सेनेचे कार्यसम्राट युवक प्रदेशाध्यक्ष श्री.संतोष(भैय्या)खंदारे व बीड जिल्हा संघटक श्री.ऋषी आहेरकर यांनी निवेदनाद्वारे सरकारला व प्रशासनाला दिला आहे यावेळी विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष श्री.सुशांत खंदारे,श्री.प्रविण आहेरकर व आदी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler