चामोर्शी रोड वरून पोटेगाव बायपास रोड वरील नाली बांधकामात अनियमितता,
गडचिरोली प्रतिनिधी
संदीप कांबळे 9421318021
चामोर्शी रोड ते पोटेगाव बायपास रोडचे कामादरम्यान गट्टूचे काम करण्यात येत आहे परंतु नालीचे अपूर्ण काम करून सदर कामाला पूर्णत्वास नेण्याचा बेत दिसत आहे. नागरिकांनी विचारणा केली असता उडवा - उडविचे उत्तर देण्यात येत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर पालिका प्रशासन एकमेकांवर दोषारोपण करीत आहे. नागरिकांनी घेतलेल्या आक्षेपाला प्रतिक्रिया देत नालीला वाढीव भिंत करण्यात आली परंतु त्या भिंतीला कुठलाही सलाखीचा आधार नाही व सरसकट जुन्या कांक्रिट भिंतीवर वाढीव कांक्रिट भिंत टाकण्यात येत आहे जणू काही नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात येत आहे. सदर कामाचे आयुष्य फार काळ टिकणार नाही हे अगदी सत्य आहे.
प्रशासनाला विनंती आहे की सदर काम थांबवून कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी.
कमीत कमी आमच्या आदरणीय लोकप्रतिनिधींनी तरी काहीतरी करावं, कुतूहलाचा विषय म्हणजेच गडचिरोली चिमूर क्षेत्राचे खासदार श्री अशोक राव नेते साहेब व राज्यमंत्री श्री विजयराव वडेठीवार साहेब यांचे बंगले सुद्धा याच रोड वर आहेत,
या मुळे वरील काम कसे चांगले करता येईल या कडे लक्ष द्यावे,