मौजा पोर्ला येथील अवैध रेती उपसा ची चौकशी करून जबाबदार अधिकारी यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करा.

 मौजा पोर्ला येथील अवैध रेती उपसा ची चौकशी करून जबाबदार अधिकारी  यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करा. अन्यथा दिनांक 28/10/2021 पासून मा. जिल्हाधिकारी कार्यालय समोर तीव्र आंदोलन करणार. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचा इशारा,

गडचिरोली प्रतिनिधी संदीप कांबळे 9421318021




    मौजा पोर्ला येथील वैनगंगा नदीतुन रात्री च्या वेळेस जेसीपी, पोखलंड  च्या साहाय्याने अवैध रेती चोरी केली जाते. व दिवसातीच रेती विकल्या जाते.तसेच नदी पात्रात जवळ पास 5000 ब्रास पेक्षा अधिक चा रेती उत्खनन  झालेला आहे. यास तहसीलदार गडचिरोली, उपविभागीय अधिकारी गडचिरोली कार्यालय चे  अधिकारी, तसेच  खनिकर्म अधिकारी गडचिरोली,यांच्या संगणमताने  अवैध उत्खनन सुरु आहे. यामुळे शासनाचा करोडो रुपये च्या महसूलाची चोरी झाली. तरी या जबाबदार अधिकारी यांच्या वर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करावी. तसेच शासनाच्या महसूल चोरीला जबाबदार या सर्व अधिकारी यांच्या सेवा पुस्तकात नोंद घेऊन, यांच्या पगारातून सदर रक्कम तात्काळ वसुल करावी. असे निवेदन  राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. महसूल मंत्री यांना पाठविले आहे.     

कार्यवाही न झाल्यास  भ्रष्टाचार विरोधी जन  आंदोलन जिल्हा गडचिरोली च्या वतीने दिनांक.28/10/2021 पासून बेमुदत  आंदोलन करण्यात येईल.

         असा इशारा निवेदनातून

योगाजी कुडवे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन जिल्हा संपर्क प्रमुख गडचिरोली.

पांडुरंग समर्थ जिल्हा सहसचिव,

सचिन भुसारी जिल्हा कोषाध्यक्ष,

धनंजय डोईजड जिल्हा सदस्य,

संजय बोबाटे  तालुका अध्यक्ष,

रवींद्र शेलोटे, तालुका उपाध्यक्ष,

चंद्र शेखर शिडाम तालुका सचिव,

अनिल कोठारे तालुका सदस्य,

विलास भानारकर तालुका

 सदस्य ,सुधीर रेवाडे,यांनी निवेदनातून केला आहे,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler