पोलीस स्टेशन शेगाव बु तर्फे आझादी का अमृत महोत्सव निमित्त अंधश्रद्धा निर्मुलन कार्यक्रम घेण्यात आला.....

पोलीस स्टेशन शेगाव बु तर्फे आझादी का अमृत महोत्सव निमित्त अंधश्रद्धा निर्मुलन कार्यक्रम घेण्यात आला.....


वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी

राकेश भूतकर मो.न.8308264808



शेगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या माध्यमातून गावागावात गुरुदेव सेवा मंडळ आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या सहकार्याने ठीकठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.काल दिनांक ३०/१२/२०२१ रोज गुरुवार ला शेगाव बु पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामपंचायत चरुर येथे आदिवासी माना जमात समाज विद्यार्थी युवा संघटना तर्फे आयोजित नागदिवाळी निमित्य कार्यक्रमामध्ये पोलीस स्टेशन शेगाव बु तर्फे आझादी का अमृत महोत्सव साजरा करत नागरिकांना अंधश्रद्धा,महिला विषयक कायदे व गुन्हे या बद्दल माहिती दिली व ग्रामपंचायत आबमक्ता येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमामधे आझादी का अमृत महोत्सव निनित्य अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती चिमूर तालुका संघटक श्री. सारंग भीमटे यांनी जादूटोणा चे प्रात्यक्षिक करून भोंदूबाबा कसे सामान्य लोकांची फसवणूक करतात हे समजावून सांगून जगात जादूटोणा,तंत्र मंत्र नसून भोंदूबाबा कडून त्यांचे शारीरिक व मानसिक शोषण केले जाते.हे सर्व थांबले पाहिजे हा उदांत हेतू समोर ठेऊन मार्गदर्शन दिले.यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक श्री. सारंग भीमटे, ठाणेदार अविनाश मेश्राम, उपनिरीक्षक प्रवीण जाधव उपस्तीत होते.या कार्यक्रमात गावकरी,महिला,बालगोपाल बहुसंख्येने उपस्तिथ होते...

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler