गावकर्यांची समस्या लक्षात येताच सभापती लता पिसे यांनी सौरपंपाची करुन दिली व्यवस्था
मौजा खांबाडा येथे सौर पंपाचे लोकार्पण
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीन वाघे मो, 7038115037
नेरी- दिनांक 30/12/2021 ला खांबाडा येथे सौर पंपाचे सौ लताताई पिसे सभापती यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आले. चिमुर तालुक्यातील नेरी वरुन जवळच असलेले खांबाडा हे गाव 2000 लोकसंख्येचे असून तेथील ऐका वॉर्डातील गेल्या काही दिवसांपासून महिलांची पाणी भरण्याची अडचण खुप होती हि बाब लक्षात घेता लताताई पिसे सभापती यांनी आपल्या 15वा वित्त आयोगातुन निधी उपलब्ध करून खांबाडा येथिल हातपंपावर सौर पंप व टाकी लावून महिलांची अडचण दूर केली.या कार्यक्रमाला खांबाडा येथील सरपंच काजल नन्नावरे उपसरपंच मंगेश धाडसे सदस्य अमोल गजभे, सुनील कडवे, रामभाऊ चौखे, सदस्या सौ. वंदना बावणे, दुर्गा चौखे, सुनंदा खाटे व कर्मचारी आणि गावातील मंडळी उपस्थित होते.लोकार्पण होताच खांबाडावासीय गावकरी यांनी सभापती यांचे आभार मानले.