लोकमान्य महाविद्यालयात महापरीनिर्वाण दिनी महामानवाला वाहिली आदरांजली

लोकमान्य महाविद्यालयात महापरीनिर्वाण दिनी महामानवाला वाहिली आदरांजली  

वरोरा तालुका प्रतिनिधी

गणेश उराडे 8928860058


वरोरा:-लोकमान्य महाविद्यालय वरोरा येथे 6 डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या पटांगणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात श्रीमती निशीगंधा सोनेकर,श्रीमती अर्चना भोगेकर,डॉ.दीपक लोणकर,डॉ.श्रीनिवास पिलगुलवार ,प्रा.तानाजी माने या सर्व प्राध्यापकांनी डॉ.आंबेडकर यांच्या बहुआयामी कार्य कर्तृत्वावर प्रकाश टाकला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के.सिंह यांनी वर्तमान परिस्थितीत बाबासाहेबांच्या विचारांची मौलिकता व्यक्त केली. हा कार्यक्रम सांस्कृतिक विभागांतर्गत घेतला गेला. सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ.जयश्री शास्त्री यांनी संचालन केले.तर सह -समन्वयक लीना पुप्पलवार यांनी आभार व्यक्त केले.या कार्यक्रमाला 150 विद्यार्थी आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler