सावरी (बिड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नव्या सुसज्ज इमारतीत स्थलांतरित करून उद्घाटन करा....

सावरी (बिड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नव्या सुसज्ज इमारतीत स्थलांतरित करून उद्घाटन करा....

वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी

राकेश भूतकर मो.न.8308264808


प्रहार सेवक यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे साकडे अन्यथा गावातील जेष्ठ नागरिक याच्या हस्ते आरोग्य केंद्राचे उद्घाटन करु सावरी प्राथमिक आरोग्य केंद्रची ईमारत दोनवर्षा पूर्वी पासुन बांधकाम पूर्ण होऊन  सुद्धा येथिल कारभार जीर्ण इमारतीत चालू. चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ४२ गावाचा समावेश आहे येथिल आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली असून  या इमारतीत प्रशस्त आशी जागा नाही आणि पुरेश्या खोल्यासुध्दा नाही त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नविन इमारत मंजुर करण्यात आली.नविन ईमारतीचे बांधकाम दोनवर्ष पूर्ण झाले आहे तरीसुद्धा नविन सुसज्ज अशा इमारतीत प्राथमिक आरोग्य केंद्र हलविण्यात यावे जेणेकरून या परिसरातील ४२ गावातील रुग्णांना आरोग्य सुविधा मिळतील अशी आशा नागरिकांना होती. मात्र दोनवर्ष  लोटूनही आरोग्य केंद्र नविन इमारतीत स्थलांतरित करण्यात आलेले नाही त्यामुळे नागरिकांच्या आशेवर  पाणी फेरले जात आहे.तरी या नविन सुसज्ज इमारतीच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे सावरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ईमारतीचे लवकरात लवकर उद्घाटन करुन तेथील कारभार नविन सुसज्ज ईमारतमध्ये हलविण्यात यावा.अशी मागणी प्रहार सेवक विनोद उमरे व त्यांचे  सहकारी सचिन घानोडे,मुरलीधर रामटेके, लोकेश खामनकर, नारायण मत्ते यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष सध्याताई गुरुनुले यांच्या कडे निवेदनातून केली आहे.अन्यथा  गावातील जेष्ठ नागरिक याच्या हस्ते उद्घाटन करू असा इशारा  निवेदनातून करण्यात आला आहे ....

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler