पोलीस स्टेशन शेगाव बु तर्फे आयोजीत भव्य आरोग्य शिबिर.....
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भूतकर मो.न.8308264808
पोलीस स्टेशन शेगांव बु येथे आज दिनांक २/१/२०२२ रोज सोमवारला ११ वाजता पोलीस अधीक्षक मा.अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात रेझिंग डे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले . तसेच विद्येची माता सावित्री बाई फुले यांच्या जयंती निमित्त आरोग्य शिबीर घेण्यात आले.या वेळी उपस्तिथ मा.संजय सांगळे(SDPO Chimur) यांनी शिबिराचे उद्घाटन केले.प्रमुख उपस्थिती म्हणून पोलीस स्टेशन चिमुरचे ठाणेदार गभने साहेब उपस्तिथ होते.या शिबिरात नागरिकांची नेत्र तपासणी,दातांची तपासणी,जनरल चेकप करण्यात आले.या शिबिराला उत्फुर्त असा प्रतिसाद मिळाला सदर शिबीर मधे १९० लोकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.शिबिराला उपस्तीत डॉक्टर नितीन चौधरी(MBBS),
डॉ. निखिल लांबट(MBBS DOMS LNEH Miraj Ophthalmologist),डॉ वैशाली लांबट स्त्रीरोग तज्ञ,डॉ संदीप टी रामटेके(BDS mumbai A-28998) तसेच पोलीस स्टेशन चे ठाणेदार अविनाश मेश्राम,उपनिरीक्षक प्रवीण जाधव इत्यादी पोलिस कर्मचारी उपस्थित होते....