प्रहार च्या पाठपुराव्याला यश,
हिंगोली जिल्हा प्रतिनिधी
बाबुराव देशमुख
मौजे डोणवाडा, तालुका वसमत येथील ग्रामपंचायत ला प्रहार शाखेने अपंगाचा पाच टक्के निधी वाटप करावा यासाठी पाठपुरावा केला होता आणि त्यानंतर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्रीयुत डुकरे सर सरपंच ज्योती बाई गायकवाड उपसरपंच रमेश दळवी यांच्या हस्ते आज वाटप करण्यात आला ,वाटप करताना माजी सरपंच बापूराव देशमुख प्रहारचे विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख बाबुराव देशमुख वेंकटी देशमुख गंगाराम देशमुख इत्यादी गावकरी मंडळी उपस्थित होते सबंध वसमत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी अपंगाच्या हक्काचा पाच टक्के निधी वाटप करावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख विष्णू जाधव प्रहार अपंग क्रांती चे उपजिल्हाप्रमुख बालाजी उदगीर यांनी गटविकास अधिकारी वसमत यांना काही दिवसापूर्वी निवेदन दिले होते या पाठपुरावा चा आधार घेऊन संपूर्ण ग्रामपंचायती लवकरात लवकर निधी वाटप करणार आहेत,
त्यातीलच एक भाग म्हणून डोनवाडा ग्रामपंचायतीने गावातील सतरा अपंगांना निधी वाटप करण्यात आला,,,