सातारा येथे नागदिवळी मोहत्सव साजरा...

सातारा  येथे नागदिवळी मोहत्सव साजरा... 


वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी

राकेश भूतकर मो.न.8308264808


वरोरा तालुक्यातील सातारा या गावात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा 1 व 2 जानेवारी  ला नागदिवळी मोह्त्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी संस्कृती चे जतन होऊन संवर्धन व्हावे व आदिवासी  समाजाची संस्कृती, चालीरीती, परंपरा, इतिहास नवीन पिढीला माहित व्हावा या अनुषंगाने  विदर्भात ज्या गावात आदीवासी माना जमात वास्तव्यास आहे त्या त्या गावात नागदिवळी मोहत्सव साजरा केला जातो. यावेळी नागदिवाळीच्या अनुषंगाने कोरोनाच्या काळात निःस्वार्थ शिक्षण देणारी कु. सोनू अशोक दडमल चा पूजा फॉउंडेशन दादापुर तर्फे सत्कार करण्यात आला. आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना विदर्भ ग्रामशाखा सातारा द्वारे या मोहत्सवाच आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष :- मा.अमोल मोरेश्वर नन्नावरे (अध्यक्ष पूजा फाउंडेशन दादापुर) मार्गदर्शक :- मा.आदित्य जिवतोडे, अमोल बोधाने (उपाध्यक्ष पूजा फॉउंडेशन ) मा. श्री. नत्थूजी मागरे (पोलीस पाटील)  कु. अल्का चौधरी,कु. समीर नन्नावरे व समस्त समाजबांधव  उपस्थित होते. यावेळी  कार्यक्राचे सूत्रसंचालन श्री. परेश दडमल  प्रास्ताविक लक्ष्मी श्रीरामे यांनी केले तर आभार प्रदर्शन आकाश भरडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler