ब्रेकिंग हिंगोली - एकाच दोराने पती-पत्नीची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
हिंगोली जिल्हा प्रतिनिधी
बाबुराव देशमुख मो -9325330034
हिंगोली जिल्हा घटनेने हादरला, कारण अस्पष्ट
हिंगोली : हिंगोली च्या सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक शिवारामध्ये एका शेतात लिंबाच्या झाडाला दोघे जन गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये दोन मृतदेह आढळून आल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सदरील घटनाही दाताडा बुद्रुक शिवारामध्ये घडले असून, हा सर्व प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. मयत दोघेही पती-पत्नी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोघेही शेतकरी तरी कुटुंबातील असुन. सेनगाव तालुक्यातल्या वाघजाळी गावचे रहिवासी आहेत. माहिती मिळताच नागरिकांनी घटनस्थळी धाव घेत बघण्यासाठी गर्दी केली आहे. त्याच बरोबर सदरील माहितीही पोलिसांना सुद्धा कळविण्यात आली आहे. अद्याप तरी या घटने मागचे कारण समजू शकले नाही. सध्यातरी या प्रकरणी पोलिसात कुठलीही नोंद झाली नसून, नुकतेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस तपासाअंती घटने मागचे खरे कारण कळणार आहे. आत्महत्याआहे कि दुसरा काही प्रकार.