शिवशंभू ग्रुप तथा शिवाज्ञा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपारिक पद्धतीने ढोल ताशा च्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी.!
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा | १९ फेब्रुवारी २०२२
संपूर्ण जगभरात देशात महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणुन स्वराज्य संस्थांपक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात त्यांच्या नामस्मरणाच्या जयघोषात तल्लीन होऊन जल्लोषात साजरी करतात. असाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श ठेवुन स्थानिक वरोरा येथील प्रभात क्रमांक नऊ विश्वकर्मा चौक येथे शिवशंभू ग्रुप तथा शिवाज्ञा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपारिक पद्धतीने भगवा ढोल ताशा व ध्वज पथक, वणी यांच्या गजरात छत्रपती. शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम शिवशंभु ग्रुप चे ससंस्थापक मा. हर्षलभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या वेळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या बहुसंख्येने उपस्थिती दर्शविली. सदर कार्यक्राचे आयोजक समिती रोषनभाऊ वरघने अध्यक्ष शिवशंभू ग्रुप वरोरा, मधुरभाऊ कातोरे उपाध्यक्ष शिवशंभू ग्रुप, मंगेशभाऊ अंबुळकर सचिव शिवशंभू ग्रुप, चेतन कडूकर सहसचिव शिवशंभू ग्रुप, विश्वास कुरेकार कोषाध्यक्ष शिवशंभू ग्रुप, समीर कींनाके, आनंदभाऊ गेडाम रुपेश कायरकर , चेतन मेश्राम , खुशाल बावणे, अमित सातपुते, नंदू रूयाळकर, गौरव पोइंकर, प्रतीक नौकरकर, प्रणय ढोके, सोहन मडावी, तन्मय उईके, विशाल कांबले, गौरव भोयर, हर्षल कोहाड, आदित्य रामटेके, नयन ठाकरे, निखिल रुयाळकर, अमोल गेडाम, सुशील धोटे, करण मडावी, अंकुश बावणे, अमन पाटील सूचित मानकर, निलेश आत्राम, उज्वल मेश्राम व सर्व मित्र परिवार यांनी केली व कार्यक्रमात सहभागी असलेल्या सर्वांना स्थानिक नागरिकांना अल्पोआहार वाटत करून कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.