आमगाव (देवळी) येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जंयती उत्साहाने साजरी करण्यात आली.

आमगाव (देवळी) येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जंयती उत्साहाने साजरी करण्यात आली.


उमरेड तालुका प्रतनिधी

मनोज चाचरकर



आज दि.१९/०२/२०२२ रोज शनिवारला आमगाव (देवळी) येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जंयती उत्साहाने साजरी करण्यात आली.शिवजयंतीच्या शुभपर्वावर सकाळी गावात ग्राम स्वच्छता करण्यात आली व त्यानंतर गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेत अनावरण गावचे सरपंच श्री शिवदासजी कुकडकर याचे हस्ते करण्यात आले.तसेच सायंकाळी जाहिर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.यावेळी प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती समिती सदस्य   आकाशवाणी केंद्र नागपूर येथे उद्बोधन म्हणून काम पाहतात. रा.स्व.संघ विदर्भ प्रांत समरसता म्हणून दायीत्व प्रा.श्री विजयजी राठोड उपस्थित होते.सदर कार्यक्रमात  बोलत असताना प्रा.विजयजी राठोड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवनावर प्रकाश टाकला व त्यानी कशाप्रकारे सर्व समाजाला सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करून समरस समाज निर्माण करण्याचे कार्य केले हे सांगितले. यावेळी मंचावर मा.ह.भ.प.श्री श्यामरावजी महाराज पुराम ,गावचे सरपंच श्री शिवदासजी कुकडकर, माझी सरपंच श्री सुखरामजी सोनटक्के उपस्थीत होते.कार्यक्रामचे संचालन महेशजी कोल्हे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रविणजी कोल्हे यांनी केले.आणि कार्यक्रमात संपूर्ण मार्गदर्शन श्री दिलीपजी कोल्हे यांनि केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता लोकेशजी  कोल्हे, गजाननजी लडी सुनीलजी गेडाम , सुरजजी मोहूरले सचिनजी शेंडे दिनेशजी वाईलकर निलेशजी पुराम  अमरजी गुरनूले मोहनजी लोंनबैल बंटीजी तराळे बचू दांडवे राहुलजी उईके  रोहित सोनटक्के समीर दुदेकर दिशांत कोल्हे आयुष कोल्हे सागर कोल्हे   सचिन डोंगरे सूरज कुडमते प्रशांत लेंडे  हिमांशू साराटे यांनी सहकार्य केले .

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler