सेवेचे ठायी तत्पर आ. संजय गायकवाड यांनी केल्या विधानसभेत विविध मागण्या

 सेवेचे ठायी तत्पर

आ. संजय गायकवाड यांनी केल्या विधानसभेत विविध मागण्या 


मेडिकल कॉलेजसह महसूल भवन,बोदवड उपसा सिंचन योजना,एमडीआर ची मान्यता पूर्ण करण्याची मागणी;

अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी मो.८२६२०८७८६६,

 बुलडाणा                                                         शिवसेनेचे आमदार धर्मवीर  संजय गायकवाड यांनी विधानसभेत आज आयोजित अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा दरम्यान बुलढाणा मतदार संघ विकासाच्या अनुषंगाने विविध मागण्या केल्या . आ. गायकवाड यांनी आरोग्य विभाग, ग्रामविकास विभाग, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, जलसंपदा विभाग, महसूल व वनविभाग आदीशी संबंधित विविध मागण्या केल्या. यात बुलढाण्यात प्रस्तावित असलेले मेडिकल कॉलेज, महावितरण चे दोन स्टेशन्स,महसूल भवन, बोदवड उपसा सिंचन योजना, एमडीआर ची कामे, पूर्ण करण्याची मागणी, कंत्राटदाराची प्रलंबित असलेली देयके अदा करण्याची मागणी केली.  


आज वर्ष 2022 - 2023 च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा आयोजित करण्यात आली हाेते. या दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी बुलडाणा मतदार संघातील विविध विकास मुद्‌दयावर शासनाचे लक्ष्य केंद्रीत करीत बुलडान्यात प्रस्तावित असलेले वैद्यकीय महाविद्यालय हा प्रस्ताव तात्काळ मान्य करण्यात यावा .तसेच मोताळा आणि बुलढाणा येथे दोन महावितरणचे सबस्टेशन.,

 जिल्हा मुख्यालय येथील सर्व शासकीय कार्यालय एकाच छताखाली येण्याच्या दृष्टिकोनातून महसूल भवन निर्माण करण्याची मागणी केली. 

तालुकास्तरावरील अनेक तहसील कार्यालय इमारती जीर्ण झालेल्या आहेत या इमारतीचे ऑडिट करून नव्याने उभारणी करण्यात यावी., मोताळा तालुक्यात असलेला बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेची कामे अतिशय संथ गतीने सुरू आहे. अनेक कामे प्रलंबित आहे ही कामे तातडीने पूर्णत्वास नेण्यात यावी., जेणे करून तेथील शेतकऱ्यांना फायदा होईल. बुलढाणा मतदारसंघात एमआयडीसीला अत्यंत तोकडी जागा आहे, त्यामुळे या ठिकाणी एकही उद्योग धंदा सुस्थितीत नाही. त्याकरिता शासनाने जास्तीत जास्त जागा खरेदी करण्याचा प्रस्ताव देखील आमदार गायकवाड यांनी मांडला . 

मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्ते यासाठी ठोस योजना बनवून ग्रामीण भागातील रस्ते जास्तीत जास्त दर्जेदार कसे होतील याकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त निधीची तरतूद करण्यात यावी., आओडीआर चे कामे एमडीआर करण्यासाठी प्रस्ताव टाकण्यात आलेला आहे, या प्रस्तावास मान्यता द्यावी. 

जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याचे सोळा टेबल कमी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धर्तीवर पारदर्शकता कशी करता येईल यासाठी ठोस धोरण निर्माण करण्यात यावी.

2019--20 20, 2021 - 2022 चे प्रलंबित देयके ठेकेदारांना तत्काळ आदा करण्यात यावी .तसेच मोताळा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय यास उपजिल्हा रुग्णालय चा दर्जा देण्यात यावा, जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करून देण्यात यावी असा प्रस्ताव आधीच दाखल करण्यात आलेला आहे या प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता देण्यात यावी. 

जनरल सर्जन विभागातील साहित्य अस्थिरोग विभाग, सोनोग्राफी विभाग, नेत्र विभाग, कान-नाक-घसा विभाग या विभागांना आवश्यक असलेली सामग्री तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी.

 अशी मागणी देखील यावेळी धर्मवीर शिवसेना आमदार श्री संजुभाऊ गायकवाड़ यांनी विधानसभेत बोलताना केली....

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler