शेतात कोणी नसल्याची पाहिली संधी कापसावर मारली चोरट्या नी दांडी
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
गणेश उराडे ८९२८८६००५८
वरोरा:- तालुक्यात कापसाच्या वेचणीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून सर्व शेत शिवारात कापूस वेचणी चालू आहे कोणी आपला कापूस घरी तर कोणी शेतात केलेल्या टींनच्या कोट्या मध्ये ठेऊन निवांत घराकडे जात परंतु चोरट्यांनी याचं गोष्टीची संधी बघत कापूस लंपास केला असाचं प्रकार तालुक्यातील चिकणी शेतशिवारात घडला.
वानोजा येथील शेतकरी दत्ताराज शंकर उताणे यांची 5 एकर शेती दीड वर्षा पासून चिकणी शेतशिवारात असून ते आपली शेती वानोजा या गावावरून बघतात गेल्या काही दिवसापासून त्यांचा शेतात कापसाची शेवटची वेचणी चालू आहे दिनांक 22 ला त्यांनी दिवसभर मंजूराच्या हातानी कापूस वेचला आणी नेहमी प्रमाणे आपले कापसाचे गाठोळे टींनच्या कोट्यात ठेऊन आपल्या गावी गेले असता त्याचीच संधी साधून गावठी चोरांनी रात्री 8 च्या सुमारास चोरी करण्याचा प्रयत्न करत असतांना गावातील नागरिकांना त्यांच्या गोट्या कडे गाडीचा लाईट दिसला गावातील नागरिकांनी दत्ताराज उताणे यांना फोन लावून विचारले असता मी शेताकडे आलो नाही असे सांगण्यात आले त्याच गोष्टीचा गावकाऱ्यांना संशय आला असता गावकरी शेताकडे गेले असता चोरट्यांनी आपली गाडी Mh.34 AS 6648 गाडी ठेऊन घटना स्थळावरून पळ काढला गावाकऱ्यांनी त्याचा पाठलाग केला असता ते सापडले नाही गाडीच्या नंबर वरून चोरांना दुसऱ्या दिवशी पोलिसांनी अटक करून जेरबंद केले. पीडित शेतकऱ्याशी आमच्या प्रतिंनिधि नी संपर्क साधला असता जवळपास 2 क्विंटल 50 kg कापूस अंदाजे 25000 किमती चा कापूस चोरीला गेल्या असल्याची माहिती दिली. पोलिसांनी चोरट्याना अटक केली आहे समोरील तपास वरोरा पोलीस करत आहे