महिला दिनानिमित्त पूजा फॉउंडेशन तर्फे होतकरू महिलांच्या कार्याचा गौरव....

महिला दिनानिमित्त पूजा फॉउंडेशन तर्फे होतकरू महिलांच्या कार्याचा गौरव....

स्त्री सक्षमीकरण ही काळाची गरज :- अमोल मो नन्नावरे....


वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी

राकेश भूतकर मो.न.8308264808


स्थानिक शेगाव बु येथून जवळच असलेल्या दादापुर या गावात सामाजिक हित जोपासण्यासाठी उदयास आलेलं फॉउंडेशन म्हणजे पुजा फॉउंडेशन या फॉउंडेशन मार्फत नेहमीच विविध सामाजिक, शैक्षणिक समाजप्रबोधनात्मक उपक्रमाचे आयोजन करून समजजागृती केली जाते. याच अनुषंगाने आंतराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून गावातील होतकरू महिलांचा सन्मान व्हावा त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळावी म्हणून पूजा फॉउंडेशन तर्फे महिलांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता याप्रसंगी बोलताना पूजा फॉउंडेशन चे अध्यक्ष अमोल मो नन्नावरे यांनी म्हंटल कि स्त्री सक्षमीकरण ही आजच्या काळाची गरज असून समाजातील प्रत्येक महिलांचा सन्मान माणूस म्हणून माणसाने करायला पाहिजे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. विद्याताई खाडे सरपंच, मा. अमोल मो नन्नावरे अध्यक्ष तमूस व पूजा फॉउंडेशन, कु. अमोल बोधाने उपाध्यक्ष,आशिष कुंभारे सचिव,सत्कारमूर्ती :-  रसिका नन्नावरे, अल्का चौधरी,मीना लेडांगे, हिरकन्या चौधरी, वैशाली तितरे पो.पाटील,सतीश कुंभारे, अक्षय बोधाने, अमोल लेडांगे, नरेंद्र लेडांगे,पुजा फॉउंडेशन चे विद्यार्थी व समाजबांधव उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे संचालन सांची तितरे ने केले तर आभार प्रदर्शन रुपाली वाघ ने केले.....

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler