राजलक्ष्मी स्कूलमध्ये महिला दिन साजरा

राजलक्ष्मी स्कूलमध्ये महिला दिन साजरा



तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे

देऊळगाव राजा



दे.राजा- अगदी प्राचीन काळापासून स्त्रीने पुरुषाला आधार दिला. सुखदुःखातही ती पुरुषाच्या बरोबरीने उभी राहिली. म्हणून आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

  या पार्श्वभूमीवर स्थानिक राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र मगर सर, प्राचार्या मनीषा नायडू यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांमधून लक्ष अग्रवाल, प्रतीक साळवे, भाविका राठोड, अर्पिता पटेल, संजीवनी जगताप, प्राची पर्हाड, वरद निमोडिया, आराध्या डोंगरे, श्रेया बोंबले यांनी भाषणे केली. तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, किरण बेदी, लता मंगेशकर, कल्पना चावला, झाशीची राणी यांची वेशभूषा करून त्यांची सुवचने सादर केली. स्त्रीशक्तीचा जागर करणारे नृत्यही सादर करण्यात आले सूत्रसंचालन ऋतुजा शेवत्रे या विद्यार्थ्यांनीने केले. सांस्कृतिक विभागाच्या वतीने कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler