देऊळगाव राजा ) : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन पोलीस पाटील जागीच ठार तर जऊळखेडा येथील दोन ठार एक जखमी.

 देऊळगाव राजा ) : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन पोलीस पाटील जागीच ठार तर जऊळखेडा येथील दोन ठार एक जखमी.


. जिल्हा संपादक

 देऊळगाव राजा - सिंदखेड राजा रोडवरील नमन कॉटन जिनिंगजवळ  ६ मार्च रोजी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली.





रामेश्वर माधवराव मुंडे (५३, रा. जांभोरा, ता. सिंदखेड राजा) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुंडे हे जांभोरा गावचे पोलीस पाटील होते. काल रात्री देऊळगाव राजाकडून गावाकडे परतताना त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. यात ते जागीच ठार झाले. धडक देणाऱ्या दुचाकीवरील दोघे ठार एक जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एक

 जखमी देऊळगाव राजा तालुक्यातील जवळखेड येथील राहणारे आहेत. घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler