जय श्रीरामाच्या गजराने दुमदुमली नेरी नगरी

जय श्रीरामाच्या गजराने दुमदुमली नेरी नगरी

आमदार बंटी भाऊ भागडीया यांच्यासह गावातील अनेक पुरुष महिला व बालगोपालाचा सहभाग


चिमुर-प्रवीन वाघे,



चिमुर- श्रीराम जन्मोत्सव कमेटी नेरी च्या वतीने दरवर्षी प्रमाने यावर्षीसुद्धा रवीवार दि,10 एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सव कमेटी नेरी द्वारा आयोजित कार्यक्रम सकाळी 9/ते 10 पर्यंत नियमीत चाललेल्या परंपरेनुसार श्रीराम मंदिर पंढरीनाथ देवस्थान पेठ विभाग नेरी येथे प्रभु श्रीरामजी यांची पुजा पाठ व हवन पार पडले.त्यान॑तर दुपारी 12 वाजताच्या दरम्यान जन्मोत्सव व भजन पार पडले त्यान॑तर सायंकाळी 6 वाजता ढोल ताशा डीझेच्या तालासुरात श्री पंढरीनाथ देवस्थान येथुन बाजार चौक नेरी व स॓पुर्ण गावातुन रॅली काढत रात्री 10 वाजेपर्यत ही मीरवनुक पार पडली या मीरवनुकी दरम्यान चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भाऊ भागडीया या॑नी उपस्थिति दाखवत प्रभु श्रीरामजी या॓ना पुष्पमाला अर्पण करून स्वत श्रीराम भक्तासोबत फुगळी खेळत जय श्रीराम चा गजर देत रॅलीमध्ये सहभागी झाले. या कार्यक्रमात नेरी शहरातील सर्व जातीय धर्माच्या पुरुष महिला व बाल गोपालानी मोठ्या प्रमानात सहभाग घेतला. या कार्यक्रमाने नेरी शहरातील नागरीका॓च्या मनात आनंदाचे वातावरण पसरले होते. कुठल्याही प्रकारचा दंगा होऊ नये याकरीता चिमुर पोलीस स्टेशन चे ठानेदार गभने यांच्या आदेशानुसार API मंगेश मोहोड़ या॔नी तगड़ा बंदोबस्त लावत शांततेत  हा कार्यक्रम पार पाडला.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler