खामगाव तालुक्यातील आवार येथे जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आवार मध्ये डिजिटल क्लास रूम चे उद्घाटन.
...अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी 8262087866,
येत्या शैक्षणिक सत्र २०२२ - २३ मधे जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आता स्मार्ट स्कूल होत आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व प्रगती साठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा श्री रामकृष्ण गुंजकर सर यांनी राष्ट्रिय स्तराच्या आधुनिक तंत्रज्ञान चा वापर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. स्मार्ट डिजिटल एज्युकेशन मध्ये विद्यार्थ्याना टॅब तसेच डिजिटल स्क्रीन द्वारे शिक्षणं देण्यात येणार असून यामध्ये जगातील सर्वोत्तम अभ्यासक्रमाच्या बरोबरीने अभ्यासक्रम, उत्कृष्ट इंग्रजी संभाषण कौशल्य ,उत्कृष्ट गणित सोडवण्याची कौशल्ये, उत्कृष्ट विचार कौशल्य, अश्या अनेक प्रकारची विद्यार्थ्यांची कौशल्य विकसित होणार आहे .स्मार्ट एज्युकेशन विद्यार्थ्याना मनोरंजनातमक शिक्षणा सोबतच त्यांच्या संकल्पना चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल. त्या निमित्त आज दिनांक १२ एप्रिल २२ रोजी संस्थेचे अध्यक्ष प्रा श्री रामकृष्ण गुंजकर सर व सचिवा प्रा सौ सुरेखाताई गुंजकर यांच्या हस्ते स्मार्ट डिजिटल क्लास रूम चे उद्घाटन करण्यात आले, त्या नंतर उपस्थित पालकांना स्मार्ट एज्युकेशन बद्दल माहिती व मार्गदर्शन करण्यात आले, यावेळी lead education system चे श्री हेमंत नागोरी, कू .फातिमा , गुंजकर कॉलेज चे प्राचार्य प्रा सतिशजी रायबोले ,जिजाऊ स्कूल चे मुख्याध्यापिका सौ अपर्णा बनकर, उपमुख्याध्यापक प्रा.संतोष अल्ल्हाट सर ,घोडके सर, ब्राम्हने सर, निळे सर, हिवराळे सर, वांढे सर, बोचरे सर, उत्पुरे सर, व्यवहारे मॅडम , गावत्रे मॅडम ,ठाकरे मॅडम, मोरे मॅडम, शेलकर मॅडम , लाव्हरे मॅडम ,डाबरे मॅडम, जंजाळ मॅडम,अकोटकर मॅडम, सांजोरे मॅडम, कुलकर्णी मॅडम, श्री अविनाश ठाकरे ,श्री निलेश कवळे, श्री नवनीत फुंडकर , श्री दामुभाऊ मिसाळ, श्री शिवा ठाकरे ,श्री तायडे , श्री घनमोडे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समवेत पालकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
