पळसखेड मालकदेव मध्ये चोरीचा धुमाकूळ सुरूच
शेतकरी वर्ग परेशान
राजेंद्र डोईफोडे जिल्हा संपादक
समृद्धी महामार्ग रिंग रोड शेजारील देऊळगाव राजा सिंदखेड राजा रोडवर असलेले पळसखेड मलकदेव या गावात चोरांनी धुमाकूळ माजवला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीतील मोटार पंप,वायर आणि शेतातील मौल्यवान वस्तू हे चोरटे लंपास करत आहेत.
समृद्धी महामार्ग गावाला लागून असल्यामुळे चोरट्यांना या वस्तू लवकरात लवकर फरार करण्यात सोईस्कर जात आहे.
दि 10 एप्रिल रोजी सुरेश शिवाजी भुतेकर आणि अंकुशराव धोंडिबा भुतेकर यांच्या शेतातील विहिरीतील मोटार पंप चोरट्यांनी एकाच रात्री लंपास केले.गावकऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार त्यांची खूप मोठी टोळी आहे कारण पळसखेड शेजारी असलेल्या तुळजापूर आणि बोरखेडी बावरा मध्येही मोटर पंप लंपास होत असल्याचे कळत आहेत गेल्या आठवड्यात चंदनराव सखाराम भुतेकर यांच्या शेतातील पंप पळवला,
त्यागोदरही खूप जणांचे शिवारातील शेतातील पंप चोरीला गेले आहेत
आता या शेतकऱ्यांपुढे दुष्काळात तेरावा महिना अश्या म्हणी प्रमाणे त्यांच्या वर खूप मोठे संकट आल्यामुळे शेतात जे पीक आहे त्याला वाचवायचं कसं याची चिंता लागली आहे आणि नवीन पंप खरेदी करून विहिरीतून पुन्हा चोरीला जाईल की काय याची भीती व्यक्त होत आहे
गेल्या महिना भरापासून पळसखेड मलकदेव परिसरात चोरांची दहशत निर्माण झाली आहे , गेल्या पंधरवड्यात शेतकऱ्यांची पाच ते सहा जनावरे चोरट्यांनी पळवली आता. दिनांक 11 ला रात्री सुद्धा चोर गावात आले होते पण गाववस्तीवर काही लोक बघून ते फरार झाले त्यामुळे हे गाव चोरट्यांच्या भीतीतच कशीतरी रात्र काढत आहे.
पोलिसांत पण तक्रार केली आहे परंतु पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे असे गावकरि चर्चा करत आहे.