बऱ्याच वर्षापासून देऊळगावराजा बायपास ठरतो धोकादायक-. प्रशासनाला केव्हा येईल जाग?

 बऱ्याच वर्षापासून देऊळगावराजा  बायपास ठरतो धोकादायक


प्रशासनाला केव्हा येईल जाग?





संतोष वासुंबे देऊळगाव राजा :- देऊळगावराजा-जाफराबाद चौफुलीजवळ रात्री तीन वाजेच्या सुमारास मालवाहतूक ट्रक पलटी झाला. यात कोणातीही  जीवितहानी झाली नाही. या अपघाताला कारणीभूत ठरत आहे शहराचा बायपास! कारण ज्यावेळी जाफराबाद चौफुलीकडे वळणमार्ग असल्याबाबत कोणताही फलक नसल्यामुळे व रोडच्या साईडला खाली उतरण्यासाठी कमी जागा असल्यामुळे हा अपघात घडला आहे. हा अपघात पहिलाच नाही तर येथे कित्तेक अपघात आतापर्यंत घडले.

     *चौफुली चौकातील डिजिटल लाईट* सुरुवातीला फक्त एक दिवस टेस्टिंग म्हणून वापरात आला होता. हा लाईट कित्येक वर्षापासून बंद पडलेल्या अवस्थेत आहे. तो जर सुरुवातीपासून चालू असता तर या ठिकाणीआतापर्यंत घडलेले असे अनेक अपघात टळले असते. सोबतच येथील रहिवासी यांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. तसेच रोडच्या कडा  व्यवस्थित करणे गरजेचे ठरते. प्रशासनाने याची दखल घ्यावी. यानंतरही एखादा मोठा अपघात घडण्यापूर्वी तरी प्रशासनाला जाग येथील का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler