चिखलीचे ग्राम दैवत रेणुकामाता यांच्या महोत्सवाला आज पासून सुरुवात.

 चिखलीचे ग्राम दैवत रेणुकामाता यांच्या महोत्सवाला आज पासून सुरुवात.





मेघा जाधव शहर प्रतिनिधी चिखली

 नवसाला पावणारी देवी म्हणुन सर्व पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या रेणुका मातेला लांबुन लांबुन  दर्शनासाठी भक्तजन येत असतात.

जवळजवळ सात वगद्याची प्रदक्षिणा मंदिराभोवती असते.

सकाळी सकाळी ढोल ताश्यांच्या गजरात टाळ मृदुंगाच्या तालात शेलुद येथुन देवीला मानाचे पातळ आले.

त्यानंतर वगदी निघाली.

वगदीला मुलं लावण्यासाठी नवस करणाऱ्यांनी मोठया प्रमाणात गर्दी केली.

राऊतवाडी परिसरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच पुर्ण चिखली शहरात मोठया प्रमाणात महाप्रसादाचे ठिकठिकाणी वाटप सुरू होते.

संध्याकाळी 5 वाजता वहन मिरवणुक निघून सकाळी वहन परत रेणुका देवीच्या मंदिरात पोहचेल.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler