बुलढाणा जिल्हा खामगाव येथील घारोड येथे हिवताप जनजागृती मोहीम
ग्राम घारोड ; बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी अमोल भोलनकर मो.8262087866, दिनांक 18/04/2022 सोमवार रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र गणेशपुर त्यांच्या साहाय्याने उपकेंद्र लोखंडा यांच्या माध्यमातून घारोड येथे हिवताप निर्मूलन जनजागृती मोहीम राबवण्यात आली.यासाठी डॉक्टर भंडारी साहेब साहाय्यक संचालक हिवताप व हत्तीरोग अकोला तसेच डॉक्टर चव्हाण साहेब जिल्हा हिवताप अधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानुसार प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. तेलंग साहेब ,डॉ. अजबे साहेब व श्री.पांडे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार घारोड येथे हिवताप जनजागृती करण्यात आली. सदर जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारोड च्या विद्यार्थ्या मार्फत गावात प्रभातफेरी काढून विविध माहिती पत्रके वाटून हिवतापा बाबत जनजागृती करण्यात आली. गावातील साचलेले डबके वाहते करण्यात आले. व त्या डबक्यावर काळे ऑईल टाकून डासांची पैदास होणार नाही याबाबत काळजी घेण्यात आली .व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.गावातील प्रत्येकाने एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले. जनजागृती साठी प्राथमिक आरोग्य केंद्र गणेशपुर यांचे अधिकारी श्री.लकडे साहेब(H.A) ,व आरोग्य सेवक श्री वैराळकर साहेब यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले .मोहिमेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सावळे सर सर्व शिक्षक श्री काळे सर ,भोलनकर सर, हिवराळे सर ,खरात सर, वाइकर सर, तिळेवाड सर ,कुमारी भुंबरे मॅडम यांनी सहकार्य केले.
