सेवानिवृत्त सुबेदार मेजर नंदकुमार पांडुरंग सपकाळ यांचे जल्लोषात स्वागत;
शिवछत्रपती ची सासरवाडी करवंड येथील सेवानिवृत्त सुभेदार मेजर सहीसलामत मातृभूमीत परत.
मेघा जाधव शहर प्रतिनिधी चिखली
बुलडाणा-चिखली तालुक्या अंतर्गत येणाऱ्या शिवछत्रपती ची सासरवाडी असलेल्या करवंड गावातील सुपुत्र सुभेदार मेजर नंदकुमार पांडुरंग सपकाळ यांचेआज १७/०४/२०२२ ला गावातील नागरिकांच्या व सपकाळ परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा करवड येथे आयोजित करण्यात आला होता सपकाळ परिवार यांनी सुभेदार मेजर नंदकुमार सपकाळ यांचे औक्षण केले . महापुरुषांच्या प्रतिमेला हार अर्पण व पुष्पहार अर्पण करण्यात आले व सपकाळ परिवाराच्या वतीने सरपंच सौ सपना काशिनाथ मोरे ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील विठ्ठल पिवळ माजी सरपंच जगन्नाथ तारगे जगन्नाथ जाधव प्रकाश चव्हाण जगदीश माळी व विविध क्षेत्रातील तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक यांचे स्वागत केले.व विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती व गावातील ज्येष्ठ नागरिक यांनी सेवानिवृत्त सुभेदार मेजर नंदकुमार पांडुरंग सपकाळ यांचे स्वागत केले
भारतीय सैन्य दलातील सुभेदार मेजर नंदकुमार पांडुरंग सपकाळ यांनी बत्तीस वर्ष अविरत सेवा दिली.आणि 31 मार्च 2022 ला ते पटना येते सेवा निवृत्त झाले . 1989 मध्ये ते नागपूर येथे सैन्य दलात भरती झाले . व शिपाई पदावर त्याची नियुक्ती करण्यात आली होती व त्यांनी प्रशिक्षण पुणे येथे घेतले वयाची बत्तीस वर्ष त्यांनी देश सेवा केली. दिल्ली आग्रा जम्मू काश्मीर ,दिल्ली ,अशा विविध राज्यांमध्ये त्यांनी देश सेवा केली देश सेवा करत असताना अनेक समस्या त्यांच्यासमोर होत्या परंतु कोणत्याही समस्येला न जुमानता अविरत देश सेवा करण्याचे काम त्यांनी हाती घेतले होते. उल्लेखनीय कामगिरी करून त्यांना विविध पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहे.. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन शेठ जाधव यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले . विठ्ठल पिवळ ,(पोलीस पाटील,) गिरहे साहेब यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केले.
1989 नागपूर येथे भरती ते 31 मार्च 2022 पटना येथे सेवानिवृत्त झाले.,( शिपाई ते मेजर सुभेदार ,) असा हा त्यांचा सैन्यदलातील कार्यकाल महत्त्वपूर्ण समजला जातो 32 वर्ष सेवा देऊन ते आपल्या माय भूमीत परतले व गावातील नागरिकांनी त्यांचा सत्कार स्वागत मोठ्या जल्लोषात केला.
सत्कार समारंभाचे प्रास्ताविक माजी सरपंच भास्कर आंढळकर यांनी तर सूत्रसंचालन श्याम वाकदकर यांनी केले तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा सांगता करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण बांधव महिला पाहुणे उपस्थित होते
