पोलिस निरीक्षक व मुख्याधीकारी यांचा जयंती उत्सव समितीच्या वतीने सत्कार
मेघा जाधव शहर प्रतिनिधी चिखली
चिखली:- स्थानिक चिखली येथे दरवर्षी प्रमाणे कोरोना काळ वगळता याहीवर्षी महामानव चक्रवर्ती सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न झाली. या उत्सवा दरम्यान चिखली पोलिस स्टेशन चे निरीक्षक मा.अशोक लांडे साहेब व सर्व पोलिस विभागाचे सर्वोतोपरी सहकार्य लाभले. तसेच न.प. चे मुख्याधीकारी यांचे सुध्दा विशेष सहकार्य लाभल्याबद्दल जयंती उत्सव समितीच्या वतीने त्यांचा आभारपत्र व सन्माचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी पोलीस निरीक्षक लांडे साहेब यांनी समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले,"अश्या प्रकारची वैचारिक जयंती साजरी करणे ही काळाची गरज आहे. आपण राबविलेले कार्यक्रम खरोखरच वैचारिक व प्रबोधनात्मक होते. त्याबद्दल समितीचे अभिनंदन". पो. नि. अशोक लांडे साहेब यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया चिखलीला आले असता त्यांना देखील समितीने राबविलेल्या विविध वैचारिक कार्यक्रमाची माहिती देऊन समितीचे कौतुक केले. त्यासोबतच लांडे साहेबांनी फुले - आंबेडकर वाटिका व मिरवणुकी दरम्यान त्यांना आढळून आलेल्या काही त्रुटी समितीच्या लक्षात आणून दिल्या. त्यावर समीतीचे अध्यक्ष यांनी न.पा. मुख्याधिकारी यांना सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्याची विनंती केली. वाटीकेत महामानवांच्या पुतळ्यांचे व परिसराचे पावित्र्य राखल्या जावे , कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसविण्याची विनंती केली आणि मुख्याधिकारी ती तत्काळ मान्य केली.
त्यावर समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ. एस.जी.राऊत यांनी यापुढे सर्व प्रकारची काळजी घेऊन महामानवांचा वैचारिक वारसा जपण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करू असे सांगितले.
यावेळी संम्राट अशोक महात्माफुले डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा डॉ एस.जी.राऊत, कार्याध्यक्षा संघमित्रा वानखेडे - कस्तुरे, सचिव स.एस. गवई, उपाध्यक्ष एन.के .सरदार, सहकोष्याध्यक्ष विशाल खरात, प्रा.श्याम वाघ व बाळासाहेब भिसे उपस्थित होते.
