खांबाडा येथे श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियाना अंतर्गत २३ एप्रिल रोजी भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबिर

खांबाडा येथे श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियाना अंतर्गत २३ एप्रिल रोजी भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबिर

आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) आणि स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर यांचा संयुक्त उपक्रम


जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर 

गणेश उराडे



वरोरा:-    श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियांतर्गत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) आणि स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर यांचा संयुक्त विद्यमाने तालुक्यातील खांबाडा येथे जि.प. प्राथमिक शाळेत २३ एप्रिल रोज शनिवारला भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

                २३ एप्रिल रोजी सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत रुग्णांची नोंदणी करण्यात येईल. या शिबिराचे उदघाटन वरोरा येथील महारोगी सेवा समिती आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू यांच्या शुभहस्ते करण्यात येईल. याप्रसंगी अध्यक्षस्थानी खांबाडा येथील जेष्ठ वैधकीय चिकीस्तक डॉ. मोरेश्वर राऊत यांच्यासह खांबाडा ग्रामपंचायत चे सरपंच प्रकाश शेळकी, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रविंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहील. 

               खांबाडा येथे आयोजित आरोग्य शिबिराचा लाभ जनतेनी घ्यावा असे संयुक्त आवाहन सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विद्यान संस्थानचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे तसेच द. मे. आ. संस्था सावंगीच्या सार्वजनिक स्वास्थ विभागाचे संचालक डॉ. अभय मुडे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते मुलींधर उमाटे, संस्थेचे कार्यवाह तथा माजी पंचायत समिती सभापती तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समिती वरोराचे संचालक दत्ता बोरेकर, देविदासपंत धोटे, नामदेवराव जोगे, विठ्ठलराव पोंगडे, सुधाकर बुराण, प्रमोद वाघ यांनी केले आहे.

            यापूर्वी भद्रावती तालुक्यातील कोंढा या गावात सदर सर्व रोग निदान व उपचार शिबिर आनंदवनचे विकास आमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले होते. त्यात जवळपास ६१० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला व त्यानंतर अनेक रुग्ण सावंगी येथील रुग्णालयात उपचारासाठी गेले होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler