डोणवाडा शिवारात दोन एकर ज्वारी आणि तुषार चा संच लाईनच्या फॉल्ट मुळे जळून खाक
हिगोली प्रतिनिधी
बाबुराव देशमुख
मो 9325330034
वसमत वसमत तालुक्यातील दोंवडा गावाच्या शिवारात हनुमंत नामदेव देशमुख व मारोती नामदेव देशमुख यांच्या शेतातील उभी असणारी दोन एकर ज्वारी व त्या ज्वारीला पाणी देण्यासाठी अंथरलेला तुषार संच विद्युत विभागाच्या भोंगळ कारभारामुळे भर दिवसा फॉल्ट होऊन जळून खाक होऊन शेतकऱ्यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले, गावाच्या उत्तरेस हा शिवार असून या शिवारातून अचानक मोठ्या प्रमाणात धूर निघाल्यामुळे दोनवाडा गावातील लोकांची रांगहोतच रांग शेताकडे, धावली पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून हळहळ व्यक्त होत होती आणि प्रत्येकाच्या मनामध्ये खरंच या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार का हे प्रश्न चिन्ह होते
