रमजान महिनाआदर्श समाज निर्मितीची प्रेरणा देतो
जमात ए ईस्लामी हिंद च्या इफ्तार पार्टीत सर्वधर्मियांचे मत
मुन्ना ठाकूर विशेष प्रतिनिधी बुलढाणा दि२८देऊळगाव राजा
रमजान महिना सत्कर्म सदाचार,ईश्वर वंदने चा महिना असून आदर्श समाजाच्या निर्मिती साठी हा पवित्र महिना प्रेरणादायी ठरतो असे मत सर्वधर्मीय समाज बांधवांनी इफ्तार पार्टीत इस्लाम धर्माबद्दल बोलताना व्यक्त केले
स्थानिक जमात-ए-इस्लामी हिंद च्या वतीने हकीम नगर स्थित मोहम्मदी मस्जिद येथे सर्व धर्मीय समाज बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार श्याम धनमने होते तर भाजप नेते डॉ सुनील कायंदे, युवक काँग्रेस नेते मनोज कायंदे,ठाणेदार जयवंत सातव, यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रास्ताविक करताना जमात-ए-इस्लामी हिंद चे शहराध्यक्ष शेख लुकमान यांनी सध्या देशभरात द्वेष भावना पसरविण्याच्या प्रकारावर सामाजिक सलोखा राखणाऱ्या उपक्रमातून सर्वधर्मीय समाज बांधवांना एका व्यासपीठावर येऊन आदर्श समाज निर्मितीच्या दृष्टीने चर्चा करण्याची गरज असल्याचे सांगितले, पवित्र रमजान महिना शांतता व सलोख्याचा संदेश देतो असे ही त्यांनी सांगितले पवित्र रमजान व रोजा उपवास चे इस्लाम धर्मात महत्व याबद्दल त्यांनी विचार व्यक्त केले , यावेळी राष्ट्रवादी नेते गणेश सवडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले समाजात एकता नांदावी म्हणून जमात-ए-इस्लामी नेहमीच विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात, देश व राज्याच्या प्रगतीसाठी समाजाला एकोपा जोपासण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले, यावेळी तहसीलदार श्री धनमने यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना इस्लाम धर्माची शिकवण सर्व मानव जातीसाठी असल्याचे मनोगत व्यक्त केले,याप्रसंगी डॉ रामदास शिंदे, राजेश इंगळे,जहीर पठाण,अल्ताफ कोटकर,राजेश भुतडा,राजू मांटे, नवनाथ गोमधरे,आकाश कासारे,सय्यद करीम,नासेर जनतासेवा,सलीम पठाण,सागर सवडे,प्रदीप वाघ,विजय हिरवे,पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेजाधव,श्री बंगाळे, यांच्यासह शहरातील सर्व धर्म समाज बांधवांची उपस्थिती होती,
