शहीद जवान संदीप एकनाथ खार्डे यांच्या मूर्तीचे अनावरण व प्राणप्रतिष्ठा सोहळा_

 शहीद जवान संदीप एकनाथ खार्डे  यांच्या मूर्तीचे अनावरण व प्राणप्रतिष्ठा सोहळा_





मुन्ना ठाकूर विशेष प्रतिनिधी बुलढाणा

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली व कामगार संघटनेचा दिवस आणि एक मे 2019 ला साडेअकरा वाजता गडचिरोली ला सुरुंग स्फोटांमध्ये 15 जवान शहीद झाले, त्यात देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद गावचे सुपुत्र शहीद संदीप एकनाथराव खार्डे यांना वीरमरण आलं.

 दोन वर्षाच्या चिमुकली नयना छत्र हरवलं ,भावाचा भाऊ दीपक चा संदीप विझला, वीर पत्नी चा पती गेला आई-वडिलांना अपार दुःख झालं, परंतु आईची कूश पवित्र झाली धन्य माता पिता तयाचिया.... कारण जे देशासाठी लढले ते अमर झाले म्हणून त्यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त 1 मे  2022 ला शहीद जवान संदीप एकनाथराव खार्डे यांच्या सहा फुटी मूर्तीचे अनावरण झाले ,पूजा विधी करून प्राणप्रतिष्ठा झाली. व सायंकाळी सात वाजता गावांमध्ये कॅन्डल मार्च काढून देशभक्तीच्या घोषणा देत शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय, जय जवान जय किसान च्या आवाजात रॅली चे शहीद स्मारकाजवळ समारोप करण्यात आला . व प्रतिष्ठित मान्यवर आजी माजी सैनिक मित्र पोलीस मित्र व आळंद गावचे समस्त गावकरी यांनी शहीदास फुल हार अर्पण करून  आदरांजली वाहिली. व शहीदा विषयी आपले मनोगत व्यक्त केले पुढच्या वेळी आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे वृक्षरोपण अन्न व किर्तन समारोह करण्याची सर्वांच्या वतीने करले याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ कायंदे, माजी सैनिक मित्र भिमराव चाटे जिल्हाध्यक्ष भारतीय नवजवान सेना, गजानन काकड सरपंच गारगुंडी, वसंतराव नागरे माजी सरपंच पिंपळगाव, माणिक गीते, विलास मांटे सैनिक उंबरखेड व आळंद गावचे सर्व आजी माजी सैनिक व समस्त गावकरी मंडळींकडून शहीद संदीपला आदरांजली वाहिली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler