वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चिखली येथे सद्भावना रैली संपन्न ..

 वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चिखली येथे सद्भावना रैली संपन्न ..






 चिखली I मयूर मोरे

चिखली :- वरूण सुर्य आग ओकत असताना सामाजिक सदंभानेवर सुध्दा काही विघ्नसंतोषी पक्षाकडून धर्माधंतेची आगलावऱ्य्या लोकांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात शांती मार्च रैलीचे आयोजन केले होते.त्याच अनुषंगाने समाजातील सलोखा कायम राहण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भाउ सुरडकर यांच्या नेतृत्वाखाली चिखली शहरातुन भव्य शांती मार्च काढण्यात आला . शहरातील महापुरुषांच्या प्रतीमाना हार घालुन रैलीला सुरुवात करण्यात आली .रैली मध्ये अबाल वृद्ध व अणेक बहुजन समाजाचे लोक हजर होते .धर्मा धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांनपासु सावधान राहण्याचा संदेश या रैलीतुन  देण्यात आला ग्रामीण भागात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असताना आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काही राजकीय पक्षांना कधी राम आठवतो तर कधी हणुमाण आठवतो अशा धार्मिकतेच्या दरीत लोठण्याचं काम काही राजकीय मंडळी करत आहे .या धार्मिकतेच्या दरीत कोणाचा जीव जाणार नाही यांची हमी वंचित आघाडीने दिली आहे . यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव सुरडकर ,ता संजय धुरंधर युवकांचे प्रेरणास्थान मुलुक मैदानी तोफ बाळासाहेब भिसे शहरध्यक्ष आणि वंचित आघाडीचे विच्यार बहुजनापर्यत पोहचविणारे भावी जिल्हपरीषदेचे उमेदवार प्रदिपरावजी वाकोडे व इतर सर्व पदाधिकारी हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler