महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या आशीर्वादाने रेती उपसा सुरूच.

 





मेघा जाधव शहर प्रतिनिधी चिखली

•सिंदखेडराजा तालुक्यामधील मौजे ताडशिवणी, पिंपळगांव कुडा, गुरुनिमगांव, हिवरखेड पुर्णा, दुसरबीड राहेरी बु. या खडकपूर्णा नदी पात्रातील रेती उपसा किनीव्दारे व जे.सी.बी.व्दारे महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या आशिर्वादाने रेती ची चोरी सर्रासपणे होत आहे. त्यामुळे • महसुल विभागा चे नुकसान होते. त्यासाठी संबंधीत महसुल अधिकरी व कर्मचारी जबाबदार आहेत. तरी सर्व संबंधिताची आपण सखोल चौकशी करून सबंधीतावर कायदेशीर कार्यवाही करावी

अशी तक्रार भीमशक्ती सामाजिक सघटना  ता अध्यक्ष रामेश्वर गवई यांनी आज सिंदखेड राजा तहसील चे नायब तशिलदार डॉ प्रवीण कुमार चंद्रभागा तुकाराम वराडे यांच्या कडे केली जर ताड शिवणी व राहेरी बू यथून अवैध रेती उपसा बंद झाल नाहीं तर भीमशक्ती संघटनेचे वतीने आंदोलन करण्यात येइल असा इशारा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे ता अध्यक्ष रामेश्वर गवई यांनी दिला

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler