खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे शाहू फुले आंबेडकर आश्रम शाळेत मान्यवरांचा सत्कार ;

 खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे शाहू फुले आंबेडकर आश्रम शाळेत मान्यवरांचा  सत्कार  ;






अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी मो.८२६२०८७८६६ , खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील शाहू फुले आंबेडकर आश्रम शाळेत विविध मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रम शाळेचे संस्थापक मा. श्री.भास्करराव वाकोडे हे होते.प्रमुख अतिथी कोषाध्यक्ष मा .श्री.शांतारामजी तायडे हे होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते शाहू फुले आंबेडकरांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आले.सत्कार मूर्ती मा. श्री.गणी गाजी सर ,ठाणेदार  (हिवरखेड पोलीस स्टेशन)मा. श्री.वाघ साहेब ,मा. श्री.जाधव साहेब(ए.एस.आय.)सौ. कविता वानखडे,मा. श्री.पंडित शेळके ,मा. श्री.प्रकाश इंगळे इत्यादीचा सत्कार करण्यात आला.सत्कार मूर्ती मा .श्री.गणी गाजी सर (अध्यक्ष लष्करिया नूरबानो हायस्कूल )यांना महाराष्ट्र शासनाचा उर्दू साहित्य अकैडमी (अल्पसंख्यांक विभाग)पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक मा. श्री.भास्करराव वाकोडे यांच्याकडून शाल,हार ,व बुके,देऊन सन्मानित करण्यात आले.तर मा. श्री.वाघ साहेब ठाणेदार ,सलोखा विषयातील उत्कृष्ट कामाबाबत संस्थेचे कोषाध्यक्ष मा. श्री.शांतारामजी तायडे ,यांनी सत्कार केला.तर खुपिया पोलीस ,मा. श्री.जाधव साहेब यांच्या होणाऱ्या सेवानिवृत्ती बद्दल सन्मानित करण्यात आले.तर मा. श्री.पंडित शेळके,यांनी सलग तिसऱ्यांदा पिंप्रा कोरडे या गावांचा सरपंच होण्याचा विश्वास  विश्वास मिळवल्या बद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले.साै .कविता विलास वानखडे हया मागासवर्गीय महिला सरपंच म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.मा. श्री .प्रकाश इंगळे त्यांच्या उत्कृष्ट व उपसरपंच पदाच्या कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.संचालक मा.श्री. संदीप वाकोडे (नागसेन )यांनी केले तर आभार मा .श्री.आर. जी.चाटे ,यांनी मानले.कार्यक्रमास आश्रम शाळेचे शिक्षक /कर्मचारी तसेच हिवरखेड पोलीस स्टेशनेचे कर्मचारी हजर होते ...

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler