तीर्थक्षेत्रला गेल्यावर मनाला शांती मिळते : सौ.सुनीता सवडे
खांडेभराड दाम्पत्यचे सवडे परिवाराकडून सत्कार
मुन्ना ठाकूर : प्रतिनिधी
तीर्थक्षेत्र जिथे गेल्यावर मन:शांती मिळते, पुण्यसंचय होतो. अशी पुण्यभूमी जिथे संत सज्जन, भगवंतानी वास्तव्य केले होते, असे ठिकाण! तिथे गेल्यावर तिथल्या सकारात्मक ऊर्जेने मनातील सर्व विकारांचा, पापांचा नाश होतो, असे प्रतिपादन माजी न.प.गटनेत्या सौ.सुनीता सवडे यांनी केले. अमृत नगर येथील खांडेभराड दाम्पत्य चारधाम यात्रेला जात असताना सवडे परिवाराच्या वतीने त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना सारख्या माहामारी चा सामना देशातील नागरिक करत होते. कोरोना मुळे सर्व यात्रा आणि प्रवासासाठी नियम असल्यामुळे चारधाम यात्रा बंद होती. परन्तु आता कोरोना रोगापासून सुटका मिळाल्यानंतर पुन्हा चारधाम यात्रेला सुरुवात झालेली आहे. श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीतील अमृत नगर येथील भगवान खांडेभराड आणि सौ प्रभावती खांडेभराड हे दोन्ही दि.२५ एप्रिल रोजी चारधाम यात्रेसाठी रवाना झाले. त्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे युवानेते गणेश सवडे व राष्ट्रवादीच्या माजी न.प गटनेत्या सौ.सुनीता सवडे यांनी छोटेखानी आयोजित कार्यक्रमात खांडेभराड दांपत्यास शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. पुढे बोलताना सौ.सवडे म्हणाल्या की, तीर्थक्षेत्री गेल्यावर प्रापंचिक सुखाचा विसर पडावा आणि केवळ मोक्षप्राप्ती हे जीवनाचे ध्येय व्हावे, असा उद्देश असतो. असे सांगितले. खांडेभराड दांपत्यास सुखद प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सवडे परिवार व खांडेभराड परिवारातील तसेच अमृत नगर भागातील नागरिक महिला उपस्थित होते.
