खाबांडा येथील पशुवैद्यकिय दवाखाना बनला शोभेची वस्तू

खाबांडा येथील पशुवैद्यकिय दवाखाना बनला शोभेची वस्तू

गेल्या अनेक दिवसापासुन पशुधन वैधकिय अधिकारी पद रिक्त

 

जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर

गणेश उराडे 8928860058



खांबाडा:- ग्रामीण भागातील पशुपालकाना त्यांच्या पशुवर वेलीच उपचाराची सोय व्हावी म्हणून शासनाने पशुवैद्यकिय दवाखाने सुरु केले मात्र वरोरा तालुक्यातील खाबाडा येथील पशुवैद्यकिय दवाखान्यात मागील अनेक दिवसापासुन वैद्यकिय अधिकारी पद रिक्त आहे तथा औषधाचा अभाव असल्याने येथील दवाखाना केवल शोभेची वास्तु ठरत आहे येथे पुर्वी पशुधन वैधकिय अधिकारी म्हणून नागले नामक अधिकारी होते पण त्यांची बदली झाल्याने येथील पशुवैद्यकिय दवाखान्याचा प्रभार टेमुर्डा येथे कार्यरत असणारे वैद्यकिय अधिकारी पोफडे यांचे कडे प्रभार देण्यात असुन आठवड्यातील एक किंवा दोन दिवस या ठिकाणी येतात पण कोणत्याच पशुवर उपचार करीत नाहि व पशुपालकांना उलट उत्तरे देतात तथा मी वैद्यकीय अधिकारी नाहि पंचायत समीतीचे विस्तार अधिकारी यांना बोलवा व उपचार करून घ्या त्यामुले येथे आलेल्या पशुपालकाला निराश होवून खाजगी वैद्यकीय डाँक्टरकडून उपचार करून घेतात,खाबाडा अंतर्गत अनेक गावे येतात बाहेरगावून येणारे पशुपालक खाबांडा येथील दवाखान्यात येतात पंरतु येथे वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याने या ठिकाणी सर्व पशुपालकांची गैरसोय होत आहेत व पशुवर वेलीच उपचार होत नसल्याने कित्येक जनावरे दगावली सुद्धा असाच काहिसा प्रकार खाबाडा येथे घडला काल रात्रि दिनाक 28/5/2022ला शंकर तानबाजी चुटे यांचे दोन्हि बैल गोठ्यात बांधले असता त्यातील एका बैलाला साप चावला हे पशुपालकाच्या लक्षात येताच त्यानी दवाखान्याकडे धाव घेतली पण तेथे वैद्यकिय अधिकारी नसल्याने त्याच्या बैलावर वेलीच उपचार करता आला नाहि व बैल दगावला ऐन पेरणीच्या हंगामात बैल दगावल्याची माहिती सकाली फोनवरून प्रभारी असलेले पशुधन वैधकिय अधिकारी पोफडे यांना दिली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देत तुम्हि मला सांगु नका पंचायत समितीचे पशुधन विस्तार अधिकारी नेवारे व शेंदरे याचना द्या त्यांनतर ते मला फोन करेल व मी समोरील कार्यवाहि करेल अन्यथा मी करणार नाहि असे हेकेखोर उत्तरे दिली वास्तविक हि सर्व माहिती त्यांनी आपल्या अधिकार्याना देणे गरजेचे असताना त्यांनी मात्र  अशी उलट उत्तरे देणे कितपत योग्य  जर एक जबाबदार अधिकारी असे वागतात तर सर्व सामान्याचे काय असा प्रश्न पशुपालकाना पडतो 

खाबांडा येथे लाखो रूपये खर्च करून शासनाने पशुवैद्यकिय दवाखान्याची सोय केली व मोठि इमारत बांधली जेणेकरून येथे वैद्यकीय अधिकारी पशुपालकाच्या चोविस तास सेवेत रहावा असे शासनाचे आदेश सुध्दा आहे तरीदेखील येथे वैद्यकीय अधिकारी निवासी रहात नाहि म्हणजेच शासनाच्या आदेशाला जणु केराची टोपली दाखवत असताना वरीष्ठ अधिकारी तथा राजकिय पुढारी गप्प का?राजकीय पुढारी साखर झोपेत आहे का ?असे एक अनेक सर्व सामान्य नागरीकाना पडतो

शासनाच्या या उदासीन धोरणामुलेच पशुपालकांना खाजगी वैद्यकीय डाँक्टरकडून मदत घ्यावी लागते परिणामी गोरगरीब पशुपालकांना आर्थीक भुर्दड सहन करावा लागत आहेत.

येथे वैद्यकीय अधिकारी निवासी रहात नसल्याने माझा बैल दगावला यासाठि मला शासन मदत करणार का जर वैद्यकीय अधिकारी निवासी असता तर कदाचित वेलेत उपचार करता आले असते आता शेतीचा हंगामाला सुरूवात होणार तेव्हा मी शेती कशी कसणार 

शंकर चुटे खांबाडा

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler