देऊळगाव राजा खंडोबा टेकडी वरून नैसर्गिक उताराने वाहणारे पाणी विरुद्ध दिशेने बदलल्यामुळे होत आहे मोठी हानी.



 देऊळगाव राजा खंडोबा टेकडी वरून नैसर्गिक उताराने वाहणारे पाणी विरुद्ध दिशेने बदलल्यामुळे होत आहे मोठी हानी.


भिमराव चाटे तालुका प्रतिनिधी देऊळगाव राजा

देऊळगाव राजा चिखली रोडवर उंबरखेड फाट्याजवळ खंडोबा टेकडीवरून वाहणारे पाणी राष्ट्रीय मार्गावर चढून  उतारा कडे जाते.

परंतु येथील पूल नाल्या पाईप गायब झाल्याने ही अडचण वाढली आहे.

जागेचे भाव वाढले, इंच इंच जागा बांधकामाशिवाय  सुटेना उलट नाल्यावर अतिक्रमण होतंय कॉलनी तयार झाल्या, नाल्यांची तोंड दाबले ,पुलाचे पाईप दिसेना, परिणामी हे बदल झाला हे पाणी अनैसर्गिकरित्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहताना राष्ट्रीय महामार्गाच्या कडीने रस्ता व माती खंगाळत सरकारी दवाखान्यापर्यंत खराब करत आहे.

जवळपास 500 मीटर जागा प्रभावित होऊन लोकांना त्रास होत आहे.

याचा त्रास दीनदयाल शाळेतील हजारो मुलांना ,कमला नेहरू शाळा, पंडित नेहरू शाळा ,सम्राट कॉलनी, शिक्षकांना ,पालकांना, गाडीने शाळेत सोडणार यांना याचा त्रास होतो.

देऊळगाव राज्यात न भूतो न भविष्यती अतिक्रमण काढून गल्ल्या व नाल्या उघड्या केल्या आहेत तेव्हा आता कळाले की लोकांनी नाल्या सुद्धा खाऊन घेतल्या. 

चिखली रोड ते राजा पद्म बुद्धि पेट्रोल पंप पासून ते राष्ट्रसंत प्लाझा पर्यंत नाल्या फाईल मध्येच राहिल्या. कारण या भागात शासकीय रुग्णालय

 नवी नगरपालिका, दीनदयाल शाळा, पंडित नेहरू शाळा ,कमला नेहरू शाळा येथून मतदान मिळत नाही या शासकीय वास्तू आहेत असा भेद पाळला गेला असावा म्हणून टेंडर आखूड झाले.

मुख्याधिकारी साहेबांनी सर्व देऊळगाव राजाच्या नाल्या उघड्या केल्या तसेच सुटलेल्या नाल्या जोडून द्याव्या व पदचारी मार्ग या शालेय विद्यार्थ्यांना बनवून द्यावा अशी समाज बांधवाकडून अपेक्षा होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler