चिमूर - वरोरा महामार्ग बंद.... पुलावरून पाणी जात असल्यामुळे वाहतूक ठप्प....
चारही बाजूने वाहनांचा संपर्क तुटला.....
चंद्रपूर जिल्हा सहसंपादक
राकेश भुतकर
मो. न.8308264808
चिमूर - वरोरा महामार्गावरील बाम्हणडोह येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे महामार्ग बंद पडला आहे.वरोरा तालुक्यात रात्रीपासून पासून सुरू असून बाम्हणहोड या नाल्याला मोठा पुर आला आहे. चिमूर - वरोरा राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई गेल्या सहा वर्षांपासून या महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. चिमूर- वरोरा या मार्गावरील बाम्हणडोह या मोठ्या नाल्याचे पुलाचे कामम सुरू असल्याने पर्यायी रस्ता म्हणून माती टाकून पुल बनविण्यात आला आहे.या पुलाची उंची अत्यंत कमी असल्याने पुलावरून पाणी जात असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.तसेच शेगाव ते चंदनखेदा - मुधोली या मार्गाची सुद्धा वाहतूक ठप्प झाली आहे. शेगाव ते आसाळा - टेमुर्डा या मार्गावरील सुद्धा वाहतूक बंद आहे या मार्गावरील वाहतूक चालु होण्याकरिता ४ ते ५ तास लागण्याची शक्यता आहे...