आजी-माजी सैनिक, शहीद पत्नी, वीर मातांचा सत्कार, सैनिक परिवाराच्या समस्या प्राथमिकतेने सोडवणार प्रशासन.
भिमराव चाटे तालुका प्रतिनिधी देऊळगाव राजा सिंदखेड राजा
आजादी का 75 वा अमृत महोत्सवी वर्षात अमृत जवान अभियान 2022 अंतर्गत तसेच जिल्हाधिकारी साहेबांच्या संकल्पनेतून प्रत्येक तालुकास्तरावर आजी माजी सैनिक व सैनिक परिवाराच्या समस्या जाणून घेऊन प्राथमिकतेवर सोडवण्या स प्रशासन सज्ज.
आजी-माजी सैनिक परिवार मेळावा तहसील कार्यालय सिंदखेडराजा च्या वतीने पंचायत समिती हॉलमध्ये उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे साहेबांच्या अध्यक्ष तेत आयोजित करण्यात आला. तहसीलदार सुनील सावंत साहेब यांनी जे प्रकरणे दिवाणी फौजदारी कोर्टात दाखल आहेत ते सोडून सैनिकांच्या सर्व प्रशासनिक समस्या तत्काळ सोडवू असे सांगितले. सैनिक परिवारावर शेताच्या बांधापासून ते घरापर्यंतच्या वादात खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत असा प्रश्न ठाणेदार केशव वाघ साहेबांकडे मांडण्यात आला त्यावेळी आपण केव्हाही या आपल्या समस्यावर बारकाईने लक्ष देऊन आपणास पोलीस बांधवांकडून सहकार्य केल्या जाईल असे ठाणेदार वाघ साहेबांनी सांगितले.
जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड कडे अर्ज करताना दोनअर्जासोबत ओळखपत्र व संबंधित कागदपत्रे जोडावे, एका अर्जावर एकच समस्या दोन समस्या असेल तर दुसरा अर्ज लिहावा जेणेकरून संबंधित विभागाकडे पत्राचा पाठपुरावा केला जातो . जिल्हा सैनिक बोर्ड सहाय्यक अधिकारी भास्कर पडघान साहेब म्हणाले. वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक करण्यासंबंधीत शासनाचे जे शासन निर्णय आहेत त्यामध्ये माजी सैनिक व ऑफिशियल क्लार्क यांच्यामध्ये समन्वय व्हावा व जमिनीच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रकरणांना शासन निर्णयाप्रमाणे न्याय मिळावा असे सैनिक मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष भीमराव चाटे यांनी तहसीलदार साहेबांना विनंती केली व सैनिक परिवारांना डिफरेन्स सॅलरी पॅकेज अंतर्गत 22 लाखाचे इन्शुरन्स एसबीआय कडून मिळते त्यासाठी प्रीमियम हप्ते भरण्याची गरज नाही अर्ज भरून कागदपत्रांची पूर्तता करावी. तसेच सर्वांनी ई सी एच एस मेडिकल कार्ड बनवून घ्यावे यांची जुने झाले असतील त्यांनी नव्याने अर्ज करावे ज्यांचे कागदपत्रे पाठवूनही दवाखान्याचे कार्ड आले नसतील त्यांनी सैनिक मित्र भीमराव चाटे यांना 80 5556 8866 वर कॉल करावा तुमचे ऑब्झर्वेशन व स्टेटस सांगितले जाईल. शासकीय योजनांचा फॉर्म अर्ज तुम्हाला व्हाट्सअप वर पाठवल्या जाईल असे सांगितले. अमृत जवान सैनिक मेळाव्यात आलेले सर्व अर्ज नायब तहसीलदार पी बी वराडे साहेबांकडे जमा करण्यात आले व नंतरही तहसील कार्यालयात सुधारित अमृत जवान अर्जाचे कव्हरिंग लेटर लावून जमा करावा जेणेकरून संबंधित विभागाकडे अर्ज पाठवता येईल असे नायब तहसीलदार वराडे साहेबांनी सांगितले. मालमत्ता कर माफीच्या संबंधात आलेल्या प्रश्नावर नगरपालिका स्तरावर व ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवकांना पत्र देण्यात येईल असे बी डी ओ साहेबांनी सांगितले. सैनिकांना सैन्यात राशन मिळते, मिल्ट्री स्टेशन हेडकॉटर जवळ असलेल्या माजी सैनिकांना तेथे मिळते, आपल्याकडे काही माजी सैनिकांना राशन मिळते काही माजी सैनिकांना मिळत नाही असे सैनिक मेळाव्यामध्ये सैनिक परिवाराकडून आलेल्या प्रश्नावर आर एफ ओ साहेबांना पत्र देऊन पाठपुरावा केला जाईल व सरकारी धान्याच्या दुकानातून राशन मिळण्याचा हा प्रश्न मार्गी लागेल असे सावंत साहेब म्हणाले यावेळी उपविभागीय अधिकारी साहेब ठाणेदार साहेब गटविकास अधिकारी साहेब मंडळाधिकारी तालुका कृषी अधिकारी दुय्यम निबंधक अधिकारी भूमी अभिलेख अधिकारी तलाठी श्रीमंत पांडव ,मनोहर चेके, व्ही आर भागिले ,तलाठी गजानन दराडे ,माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष द्वारकीनाथ जगन्नाथ म्हस्के, उपाध्यक्ष फकीरा जाधव, सदस्य लिलाबाई खरात ,त्रिदल जिल्हा अध्यक्ष प्रभाकर देशमुख, वसंतराव दराडे ,ज्ञानेश्वर केकान, वीर पत्नी शोभा कुंडलिक मुंडे सह तालुक्यातील माजी सैनिकांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.