भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव वर्षात ७५ तज्ञ डॉक्टरांकडून महाआरोग्य शिबिर १७५० रुग्णांनी घेतला लाभ

 भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव वर्षात ७५  तज्ञ डॉक्टरांकडून महाआरोग्य शिबिर   १७५० रुग्णांनी घेतला लाभ






देऊळगाव राजा प्रतिनिधी भिमराव चाटे

देऊळगाव राजा येथे दिनांक 31 जुलै ला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात  मा सैनिकमित्र फाउंडेशन राजलक्ष्मी शैक्षणिक संकुल श्री गणपती नेत्रालय जालना सह 75 सुपर स्पेशलिटी तज्ञ डॉक्टर तसेच डॉक्टर रामप्रसाद जी शेळके यांच्या नेतृत्वात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.


सविस्तर वृत्त असे की सकाळी नऊ वाजता श्री गणपती नेत्रालय जालना नेत्र तपासणी शिबिर शुभारंभाची डॉक्टर रामप्रसाद शेळके यांनी पाच शहिदांच्या वीर नारींच्या हस्ते उद्घाटन केले. व सकाळपासूनच आलेल्या शिबिरार्थीच्या रांगा भव्य हॉलमध्ये लागल्या. दहा वाजता   रक्ताच्या थेंबा थेंबातून देशभक्ती रक्तदान शिबिर उद्घाटन देशाच्या सेवेसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या शहिदांच्या पाच वीर माता-पित्याच्या हस्ते करण्यात आले. व जालना सामान्य रुग्णालय बचत पेढीकडून रक्तदान शिबिर सुरू झाले.

अकरा वाजता राष्ट्रीय सन्मान कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर रामदासजी शिंदे सह पाच शहिदांच्या चिमुकल्यांच्या हस्ते वीर पुत्र आर्यन योगेश दराडे हर्ष संदीप मुंडे, सुरज, सार्थक, शहीद प्रदीपच्या जयदीपने   दीप प्रज्वलन करण्यात आले.

 त्यानंतर सन्मान राष्ट्रीय कर्तुत्वाचा देशासाठी आपले रक्त सांडणाऱ्या शहीद जवानांचे वीर माता पिता वीर पत्नी ना सन्मानित करण्यात आले त्यांना साडीचोळी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यात मराठा लाईट इन्फंट्री चे मांडव्याचे जम्मू काश्मीर मध्ये शहीद झालेले योगेश दिनकर दराडे यांचे माता पिता व आर्यन योगेश दराडे, बॉम्बे इंजिनियर ग्रुपचे

शहीद संदीप निवृत्ती मुंडे वीर माता जनाबाई निवृत्ती मुंडे व वीरपुत्र हर्ष संदीप मुंडे  पळसखेड चक्का 10 महार रेजिमेंटचे जम्मू काश्मीर ग्लेशियर मध्ये शहीद झालेले शहीद प्रदीप साहेबराव मांदळे यांची वीरमाता सुनंदा मांदळे वीर पत्नी कांचनताई मांदळे , गडचिरोली हल्ल्यात शहीद झालेले आळंद गावचे शहीद संदीप खार्डे यांचे वीर पिता एकनाथ खार्डे वीर माता कमलताई खार्डे, तसेच आपले स्वतःची तीनही मुले सैन्यात पाठवणारे शहीद सतीश पेहेरे यांचे वीर पिता सुरेश छोटीराम फोन पेहेरे व वीर माता अलका सुरेश  पेहेरे सैनिक मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष भिमराव चाटे माजी सैनिक रंजन तुकाराम वाघ माजी सैनिक रमेश बर्डे यांच्या कार्याची जाण ठेवून स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवात डॉक्टर रामप्रसाद जी शेळके साहेब यांनी माभव्य दिव्य सन्मान सैनिक परिवाराला दिला महाआरोग्य शिबिर कार्यक्रमाच्या पहिल्याच टप्प्यात प्राथमिकतेने माजी नगराध्यक्षा सरस्वती ताई टेकाळे छगन दादा मेहेत्रे एडवोकेट प्रदीप घेवंदे दादाराव पाच फुले अशोक पाटील यांच्याकडून करून घेतला सैनिक परिवाराला सन्मानित करण्याचा भव्य उपक्रम देऊळगाव राजा मध्ये पहिल्यांदाच घडला. 

 भारत मातेच्या घोषणेमध्ये सर्व शिबिराचे वातावरण देशभक्तीमय होऊन गेले. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रा मध्ये राष्ट्रीय स्तराचे कर्तुत्व करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले, डॉक्टर रामदासजी शिंदे यांची 40 वर्षापासून अविरत सेवा देत यांचा सन्मान करण्यात आला ,तसेच डॉक्टर अक्षय गुट्टे यांनी कोरोनाच्या काळात ॲम्बुलन्स सह सोबत रात्रंदिवस सेवा देण्याचे काम केले त्यांच्या आई-वडिलांना राष्ट्रीय कर्तुत्वाचा सन्मान देऊन गौरविण्यात आले, तसेच  शिवव्याख्याते उद्धव शेरे यांचाही सन्मान करण्यात आला व पत्रकारिता क्षेत्रात 32 वर्षापासून संपूर्ण माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचवणारे प्रसिद्धी प्रमुख ज्येष्ठ पत्रकार सुरज गुप्ता यांना राष्ट्रीय कर्तृत्वाचा सन्मान देण्यात आला. सोबतच सर्व सुपर स्पेशलिटी जालना जिल्हा तज्ञ डॉक्टर व देऊळगाव राजा तालुक्यातील निस्वार्थ सेवा देणाऱ्या 75 तज्ञ डॉक्टरांचा सन्मान चौथ्या टप्प्यात करण्यात आला. शिबिरार्थींनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला 175 शिबिरार्थीं मोफत व सवलतीच्या दरात शस्त्रक्रियेसाठी पात्र झाले. 75 शिबिरार्थी  चष्म्यास पात्र झाले .सकाळी नऊ वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाआरोग्य शिबिर चालले .

डॉ निखिल रामदास जी शिंदे व डॉ अपर्णा निखिल शिंदे देऊळगाव राजा यांच्याकडे जास्तीत जास्त शिबिरार्थींनी तपासणी केली शिबिरार्थींना नाश्ता चहा पाणी वेळोवेळी देण्यात आले मधल्या जेवणाच्या सुट्टीनंतर पुन्हा साडेपाच वाजेपर्यंत शिबिरार्थींच्या रांगाच रांगा होत्या या महाआरोग्य शिबिरामध्ये जनरिक मेडिसिन चा स्टॉलचा पहिल्यांदाच प्रयोग करण्यात आला तो यशस्वी ठरला. जनरिक स्टोअर  मालक राजेश झोरे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला मेंदू तज्ञ पासून ते दंतविकार तज्ञ मुखरोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ, पोट विकार तज्ञ ,मूळव्याध तज्ञ ,अस्थिरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ बालरोग तज्ञ, सोनोग्राफी तज्ञ अर्धांग वायू ॲक्युपंक्चर तज्ञ मानसोपचार तज्ञ अरुण वाघ साई लॅब यांनी सुद्धा सर्व शिबिरार्थींना 50 टक्के सवलत सेवा दिली, अल्ट्रासाउंड सोनोग्राफी यामध्येही भव्य सूट दिली. त्वचारोग तज्ज्ञांची बराच वेळ पेशंटनी प्रतीक्षा केली  जालना येथील स्पेशलिस्ट डॉक्टरांनी या कार्यक्रमाची प्रशंसा करत कार्यक्रमासाठी डॉक्टर रामप्रसाद शेळके मित्र मंडळ फाउंडेशन आणि सैनिक मित्र फाउंडेशन यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पाडला ,स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यामध्ये इतरत्र आटापिटा करतात त्यापेक्षा देशाचा स्वातंत्र्याचा वाढदिवस कसा साजरा करावा हे डॉक्टर रामप्रसाद शेळके मित्र मंडळ फाउंडेशन व सैनिक मित्र  फाउंडेशन ने दाखवून दिले. असे शिबिर व असा सन्मान कधीच झाला नाही अशी कौतुकाची चर्चा सर्वत्र आहे राजेश पंडित सह राजलक्ष्मी शैक्षणिक संकुल टीम दत्ता हांडे भिमराव चाटे सह सैनिक मित्र टीम व डॉक्टर रामप्रसाद शेळके साहेबावर प्रेम करणाऱ्या सर्व मित्र फाउंडेशन चा अथक सहभाग आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler