लाचखोर मुख्याध्यापकासह चार कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

भारत विद्यालयातील घटना:11 वीच्या प्रवेशासाठी स्वीकारली 10 हजाराची लाच

बुलढाणा जिल्हा संपादक राजेंद्र डोईफोडे

बुलढाणा- अंशतः अनुदानित यादीनुसार भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुलढाणा येथे इयत्ता ११,विज्ञान शाखेत प्रवेश देण्याकरिता विद्यार्थ्यांच्या पालकांकडून दहा हजारांची लाच स्वीकारताना भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापकासह चार जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले आहे. आज सायंकाळच्या सुमारास भारत विद्यालय बुलढाणा येथे सदर कारवाई करण्यात आली. प्रल्हाद धोंडू गायकवाड, वय ५३ वर्षे, पद- मुख्याध्यापक रा. महाराणा प्रताप नगर, सुंदरखेड, गजानन सुखदेव मोरे, वय 38 वर्षे, पद- वस्तीगृह कार्यवाहक,   दि युथ लीग रिक्रिएशन सेंटर, बुलढाणा. रा. बिरसिंगपूर, ता. जि. बुलढाणा, जितेंद्र प्रल्हाद हिवाळे, वय 36 वर्षे, पद- मजूर  दि युथ लीग रिक्रिएशन सेंटर रा. नांद्राकोळी, ता. जि. बुलढाणा, राहुल विष्णू जाधव, वय 37 वर्षे, पद- लेखापाल  लव ट्रस्ट फोर इंडियन चिल्ड्रन इन नीड, खामगाव रोड, बुलढाणा. रा. देऊळघाट, ता.जि. बुलढाणा. अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वावरे लेआऊट बुलढाणा येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीच्या वतीने पडताळणी करण्यात आली. पडताळणीत आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाल्यावर आज सापळा रचण्यात आला.

भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तक्रारदाराच्या मुलाला अकरावीत प्रवेश देण्यासाठी मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड यांच्या वतीने वस्तीगृह कार्यवाहक गजानन मोरे याने पंधरा हजाराच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती दहा हजारात सौदा पक्का केला गेला. आरोपी जितेंद्र प्रल्हाद हिवाळे याने तक्रारदारास लाच देण्यासाठी प्रवृत्त केले तर आरोपी लेखापाल राहुल विष्णू जाधव याने मुख्याध्यापकाच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून दहा हजाराची लाच स्वीकारली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चारही आरोपींना रंगेहात अटक केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler