विज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू तर पती जखमी; सिदखेडराजा तालुक्यातील घटना.
पवन उगलमुगले सिंदखेडराजा ग्रामीण पत्रकार
सिंदखेड राजा तालुक्यात दि. ४ ऑगस्ट रोजी परिसरामध्ये दुपारी अंदाजे १ ते २ वाजेच्या सुमारास मे गर्जना सह जोरदार पाऊस सुरू झाला यामध्ये शेतात काम करणारे पावसापासून वाचण्यासाठी झाडाचा सहारा घेतला परंतु झाडावर वीज पडून एका शेतकरी महिलेचा मृत्यू तर पती जखमी झाले.
सविस्तर वृत्त असे की दि.४ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेदरम्यान साठेगाव परिसरात जोरदार पाऊस चालू झाला तसेच पावसासोबत हवा व विजेचा कडकड आवाज चालू झाला. यामध्ये साठेगाव येथील शेतात काम करणारे महिला रुक्मिणीबाई गजानन नागरे व त्यांचा पती गजानन नागरे पावसापासून बचाव म्हणून शेतातील बोरीच्या झाडाखाली उभे राहिले विजेच्या कडाकडा सह पाऊस होत असताना बोरीच्या झाडावर वीस कोसळली व त्यामध्ये रुक्मिना गजानन नागरे यांचा जागेवर मृत्यू झाला तर त्यांचे पती गजानन नागरे हे जखमी झाले पुढील उपचारासाठी त्यांना जालना येथे भरती करण्यात आले.
